---Advertisement---

ऑस्ट्रेलियन महिलांनी रचला इतिहास! टी20 विश्वचषक जिंकण्याची दुसरी हॅट्रिक, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

On: रविवार, फेब्रुवारी 26, 2023 9:45 PM
Australia Team
---Advertisement---

रविवारी (26 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेलला गेला. कॅपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिका संघाला 19 धावांनी मात दिली. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने महिला टी-20 विश्वचषकातील स्वतःचा दबदबा अधिकच वाढवला. ही सहावी वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली.

आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा पहिला हंगाम 2009 साली खेळला गेला होता. जो इंग्लंड संघाने जिंकला. त्यानंतर 2010, 2012, 2014 या तीन हंगांममध्ये ऑस्ट्रेलियन संघाने लागोपाठ टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. त्यानंतर 2018, 2020 आणि यावेळी 2023 सालची महिला विश्वचषक ट्रॉफी जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने विजयाची दुसरी हॅट्रिक नावावर केली. दरम्यानच्या एका वर्षात म्हणजेच 2016 साली वेस्ट इंडीज संघाने महिला टी-20 विश्वचषक नावावर केला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ फक्त एकदा म्हणझेच 2009 साली विश्वचषकात अंतिम सामन्यात पोहचू शकला नव्हता. त्याव्यतिरिक्त राहिलेल्या सातही महिला टी-20 विश्वचषकांमध्ये ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या अंतिम सामन्याचा विचार केला, तर बॅथ मुनी ऑस्ट्रेलियासाठी मॅच विनर ठरली. मुनीने 53 चेंडूत नाबाद 74 धावा कुटल्या आणि ऑस्ट्रेलियन संघाला विश्वचषक मिळवून देण्यासाठी सर्वात मोठे योगदान दिले. या महत्वाच्या धावा केल्यामुळे तिला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघासाठी सलामीवीर लॉरा वॉलवर्ड्स हिने 48 चेंडूत 61 धावांची महत्वपूर्ण खेळी केली, पण नंतर आफ्रिकी संघाची एकही फलंदाज अर्धशतक करू शकली नाही.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 6 बाद 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकी संघ मर्यादित 20 षटकांमध्ये 6 बाद 137 धावांपर्यंत मजल मारू शकला.

(The Australian team won the Women’s T20 World Cup for the sixth time)

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आधी बीए पास कर आणि मग पीसीबी अध्यक्ष…’, माजी दिग्गजाचा शोएब अख्तरवर निशाणा
दिल्लीला दुहेरी धक्का! पंतच्या जागी यष्टीरक्षण करणारा खेळाडूही दुखापतग्रस्त, नुकताच गाजवलेला देशांतर्गत हंगाम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---