आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघांना चाहते आमने सामने पाहू इच्छित होते. मात्र, सुपर फोरमध्ये पाकिस्तानला श्रीलंकेकडून पराभव मिळाल्यामुळे असे होणार नाही. आशिया चषकाचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. पण त्याआधीच भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोन्ही संघांतील द्विपक्षीय मालिकांबाबत महत्वाचे विधान केले.
भारत आणि पाकिस्तान संघ मागच्या अनेक वर्षांपासून एकही द्विपक्षीय मालिका खेळले नाहीत. आयसीसी आणि एसीसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामना चाहत्यांना पाहायला मिळतो. पण त्याव्यतिरिक्त दोन्ही संघ एकमेसांसोबत खेळत नाही. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानमध्ये गेले होते. पीसीबी आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांनी एकत्र बसून आशिया चषक सामना पाहिला. बीसीसीआय अधिकाऱ्यांचा हा दौरा दोन दिवसांचा होता, ज्यामध्ये काही महत्वाच्या मुद्यांवर पीसीबीसोबत चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू होणार, अशा चर्चाही सुरू झाल्या. पण शनिवारी (16 सप्टेंबर) क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला.
केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही, हे स्पष्ट केले. ठाकूर म्हणाले, “बीसीसीआयने खूप आधी हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत पाकिस्तानमधील आतंकवाद संपत नाही. सीमेपलीकडून होणारे हल्ले आणि घुसखोरी थांबत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी द्विपक्षीय सामने खेळणार नाही. देशातील जनतेची देखील अशीच इच्छा आहे.”
दरम्यान, मागच्या काही दिपसांपासून कश्मीरच्या अनंतनागमध्ये आतंकवादी आणि भारतीय जवानांमध्ये आमना सामना होत आहे. याच पार्श्वभूमीवर क्रीडामंत्र्यांनी शनिवारी भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबतही चित्र स्पष्ट केले. उभय संघांतील शेवटची द्विपक्षीय मालिका 2013 मध्ये भारतात खेळली गेली होती. (The ban on India-Pakistan bilateral series will remain in place, says Sports Minister Anurag Thakur)
महत्वाच्या बातम्या –
‘या’ दोन्हींपैकी एक संघ जिंकणार वनडे विश्वचषक! माजी श्रीलंकन कर्णधाराची भविष्यवाणी
श्रीलंकन युवा दुकली ठरतेय आशिया कपमध्ये यशस्वी! पाहा टॉप फाईव्ह गोलंदाजांची यादी