श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्या मते यजमान भारतीय संघ वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. पण त्याचसोबत इंग्लंड संघाचे पारडेही जड असेल. संगकाराने यावेळी त्याने दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या श्रीलंकन संघाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही सांगितले. 5 ऑक्टोबर ते 19 सप्टेंबर यादरम्यान भारतातील 10 स्टेडियमवर विश्वचषक सामने खेळवले जातील.
यावर्षी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. अशात मायदेशातील परिस्थितीचा फायदा भारताला होणार, यात शंका नाही. कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याच्या मते मायदेशातील वनडे विश्वचषकात भारत ट्रॉफी जिंकू शकतो. पण सोबतच गतविजेता इंग्लंड संघ देखील ट्रॉफी उंचावण्यासाठी दावेदार आहे. या दोन संघांचे प्रदर्शन विश्वचषकात पाहण्यासारखे असेल. पण श्रीलंकन संघाचे प्रदर्शन देखील अलिकडच्या काळात पाहण्यासारखे राहिले आहे. संगकाराच्या मते विश्वचषकात श्रीलंकेने अंतिम सामन्यापर्यंत बाजी मारली, तर त्यात आश्चर्याची कोणती बाब नसेल. शुक्रवारी (15 सप्टेंबर) न्यूझीलंडच्या सामन्यात इंग्लंडने 100 धावांनी विजय मिळवल्यानंतर संगकारा बोलत होता.
यावेळी चर्चेत संगकारासोबत इंग्लंडचा माजी कर्णधार ओयन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल उपस्थित होते. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संगकारा यावेळी म्हणाला, “मला वाटते भारत आणि इंग्लंड सर्वात मोठे दावेदार (विश्वचषक जिंकण्यासाठी) आहेत. मी श्रीलंकेचा शेवटचा सामना पाहिला. संपूर्ण आशिया चषकात त्यांनी ज्या पद्धतीने प्रदर्शन केले, ते पाहून श्रीलंकाही प्लेऑफमध्ये कडवे आव्हान देऊ शकते. एकदा संघ प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम सामन्यासाठी फक्त एक विजय हवा असतो. तुमचा दिवस चांगला अशला, तर संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकतो.” दरम्यान, गुरुवारी (14 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकन खेळाडूंचे प्रदर्शन कौतुकास्पद राहिले. (One of these two teams will win the ODI World Cup, former Sri Lankan captain’s prediction!)
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंकन युवा दुकली ठरतेय आशिया कपमध्ये यशस्वी! पाहा टॉप फाईव्ह गोलंदाजांची यादी
वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानला ‘440 व्होल्टचा झटका’, नसीम शाह आख्ख्या स्पर्धेतून बाहेर!