क्रिकेटविश्वात मागील काही दिवसांपासून निवृत्ती घेण्याच्या अनेक वार्ता पुढे येत आहे. तर आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने त्याची निवृत्ती सोमवारी (19 सप्टेंबर) जाहीर केली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. यामागचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन याने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली असून तो आता फक्त वनडे आणि टी20 मध्ये खेळणार आहे. त्याने दिलेल्या स्पष्टीकरण आणि क्रिकबजनुसार, ‘युवा खेळाडूंना संधी मिळण्यासाठी त्याने कसोटीमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.’
हुसेनने बांगलादेशकडून शेवटचा कसोटी सामना 2020मध्ये खेळला आहे. यानंतर त्याला कसोटीमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच त्याची या दिर्घकाळाच्या क्रिकेट प्रकाराची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे.
हुसेनने 2009मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो फक्त 27 कसोटी सामन्यांमध्येच खेळला. यातील 44 डावांमध्ये त्याने एकूण 36 विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या सामन्यात त्याने वेस्ट इंडिजचे तीन विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने फलंदाजी करताना 265 धावा केल्या.
कसोटीबरोबर हुसेनने बांगलादेशकडून 104 वनडे सामने खेळलेले आहेत. यामध्ये त्याने 129 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने एका सामन्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक विकेट्सही घेतल्या. तर सात सामन्यांमध्ये चार किंवा चारपेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच तो वनडेमध्ये हॅट्ट्रीक घेणारा तिसरा बांगलादेशी खेळाडू आहे. तसेच त्याने 28 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत.
हुसेनला आगामी टी20 विश्वचषकासाठी संघात घेतले नाही. त्याने बांगलादेशकडून शेवटचा टी20 सामना 2021मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. तसेच त्याला आशिया चषकाच्या संघातही जागी मिळाली नव्हती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी
कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
‘तेव्हा’ युवराज बनला सिक्सर किंग! वाद फ्लिंटॉफचा पण किंमत मोजावी लागली स्टुअर्ट ब्रॉडला