बीसीसीआयने शनिवारी (१९ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा (Wriddhimaan Saha) याला या मालिकेसाठी निवडले गेले नाही. यादरम्यानच साहाने आरोप केला आहे की, एका प्रसिद्ध पत्रकाराने त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. साहाने स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून त्या पत्रकाराने केलेल्या मेसेजेसचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, बीसीसीआय यासंदर्भात कारवाई करण्यापूर्वी साहाशी चर्चा करेल.
साहाने हा स्क्रीनशॉट ट्वीटरवर शेअर केला असला, तरी त्याने यामध्ये त्या पत्रकाराच्या नावाचा मात्र उल्लेख केला नाही. बीसीसीआय साहा त्या पत्रकाराचे नाव सांगण्याचा आग्रह करू शकते. या प्रकरणानंतर भारताचे माजी खेळाडू साहाच्या समर्थनात पुढे आले आहेत. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्वीटरवर लिहिले की, “खूप दुःखी आहे. तो सन्मानितही नाही आणि पत्रकार देखील नाही, फक्त चमचागिरी. मी तुझ्या सोबत आहे वृद्धी.”
Extremely sad. Such sense of entitlement, neither is he respected nor a journalist, just chamchagiri.
With you Wriddhi. https://t.co/A4z47oFtlD— Virender Sehwag (@virendersehwag) February 20, 2022
तसेच भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने लिहिले की, “वृद्धी त्या व्यक्तिचे नाव सांग, जेणेकरून क्रिकेट जगतातील लोकांना कळू शकेल, अशा प्रकारे कोण कोण करत आहे. जर तू सांगितले नाही, तर चांगले पत्रकार देखील संशयाच्या घेऱ्यात येतील. ही कोणत्या प्रकारची पत्रकारिता आहे?”
Wridhi you just name the person so that the cricket community knows who operates like this. Else even the good ones will be put under suspicion.. What kind of journalism is this ? @BCCI @Wriddhipops @JayShah @SGanguly99 @ThakurArunS players should be protected https://t.co/sIkqtIHsvt
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 20, 2022
साहाने शेअर केलेल्या स्क्रीनशॅटमध्ये पत्रकाराने लिहिले आहे की, “मला एक मुलाखत दे, हे चांगले राहिल. पण जर तुला लोकशाही बनायचे असेल, तर मी दबाव टाकणार नाही. ते एका यष्टीरक्षकाची निवड करतात, जो सर्वात चांगला असेल. तू ११ पत्रकारांना निवडण्याचा प्रयत्न करतो, जे माझ्या मते सर्वात चांगले नाहीत. त्याला निवडा, जे सर्वात जास्त मदतगार ठरू शकतील.” पत्रकाराने पुढे लिहिले की, “तू मला फोन केला नाही. मी तुझी मुलाखत कधीच घेणार नाही. मी ही गोष्ट हलक्यात घेणार नाही आणि लक्षात ठेवेल. तू असे नव्हते केले पाहिजे.”
सहाने भारतासाठी आतापर्यंत ४० कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने तीन शतक आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने १३५३ धावा केल्या. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्याने ९२ झेल घेतल्या आणि १२ स्टंपिंग केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
अर्धशतकानंतर सूर्याचा ‘नमस्कार’; भारतीय फलंदाजाने खास सेलिब्रेशनने जिंकली अनेकांची मने, पाहा व्हिडिओ
मुलगा आवेशच्या पदार्पणाविषयी वडिलांना नव्हती कसलीही कल्पना; म्हणाले, ‘खूप दिवसांपासून वाट पाहात…’
T20 Series: वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप करत कर्णधार रोहितने विराटला केले ओव्हरटेक, बनला ‘नंबर १’