---Advertisement---

या 7भारतीय खेळाडूंचं करिअर पणाला! वेस्ट इंडिज मालिकेपुर्वी होणार खरी परीक्षा

On: गुरूवार, सप्टेंबर 4, 2025 4:27 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाला ऑक्टोबरमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघ या मालिकेत दमदार कामगिरी करायला उत्सुक आहे. पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार असून दुसरा सामना 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान रंगणार आहे. याआधी भारतात दलीप ट्रॉफीचे आयोजन होत आहे. 4 सप्टेंबरला उपांत्य फेरीचे सामने वेस्ट झोन विरुद्ध सेंट्रल झोन आणि नॉर्थ झोन विरुद्ध साऊथ झोन असे खेळले जात आहेत.

भारताचे 7 स्टार खेळाडू उपांत्य सामन्यांत सहभागी झाले आहेत. त्यात श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, खलील अहमद, ध्रुव जुरेल आणि अंशुल कंबोज यांचा समावेश आहे. हे खेळाडू वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी दलीप ट्रॉफीत चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये आपला दावा भक्कम करायला इच्छित आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---