भारतीय संघाचे दोन दिग्गज विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद लपून राहिला नाहीये. इंडिनय प्रीमियर लीग 2023 मध्ये या दोघांमधील घमासान लाईव्ह सामन्यात सर्वांनी पाहिले होते. आयपीएल 2013मध्येही गंभीर आणि विराट एकमेकांशी अशाच पद्धतीने भिडले होते. पण गंभीरच्या म्हणण्याप्रमाणे विरासोबत त्याचा वाद केवळ मैदानामध्ये असतो. मैदानाबाहेर असे काहीच नाहीये.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताने 1-2 अशी आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा वनडे सामना भारताने जिंकल्यानंतर गौतम गंभीर याने विराटबाबत खास प्रतिक्रिया दिली. विराट कोहली () याने कोणत्या गोलंदाजाविरुद्ध आपले 50वे वनडे शतक पूर्ण केले, असा प्रश्न त्याला विचारला गेला होता. याचे उत्तर एका क्षणात देत गंभीर म्हणाला, “लॉकी फर्ग्यूसन.” कार्यक्रमात गंभीरसोबत असलेला पीयूश चावला हे उत्तर ऐकून थक्क झाला. गंभीर पुढे म्हणाला, “हे तुम्ही सारखे दाखवा. मला सर्वकाही लक्षात असते. मझा वात फक्त मैदानातील आहे.”
दरम्यान, गंभीर आणि विराट यांनी भारतीय संघासाठी एकत्र क्रिकेट खेळले आहे. गंभीर 2018 मध्ये आयपीएलमधून निवृत्त झाला. पण मागच्या काही हंगामांमध्ये त्याने प्रशिक्षक आणि मेंटॉरच्या भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडली. मागच्या वर्षी गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील एका सामन्यादरम्यान विराट आणि अफगाणिस्तानचा नवीन उल हक यांच्यात वाद पेटला. सामना संपल्यानंतर हा वाद अधिकच तापला होता. अशात गंभीरने आपल्या संघाचा खेळाडू असलेल्या नवीनची बाजू घेत या वादात उडी घेतली. यानंतर विराट आणि गंभीरमध्येही चांगलेच वातावरण तापले होते.
Kohli 🤝 Gambhir
That smile at the end tho 😄pic.twitter.com/jSXz2xFUE6— Ishan Joshi (@ishanjoshii) December 23, 2023
गंभीर पुढे असेही म्हणाला की, “हे केवळ नवीन उल हकविषयी नव्हते. कोणताही खेळाडू असता, तर मी त्याला वाचवले असते. ते माझे कामच आहे. मी असाच आहे. माझ्या खेळाडूंना मी का वाचवू नये. केवळ ब्रॉडकास्टर्स त्यांच्यासाठी (विराट) काम करत आहेत म्हणून मी असे करू नये का? जर मी संघातील खेळाडूंसोबत उभा राहू शकत नसेल, तर मला ड्रेसिंग रुममध्ये जाण्याचाही काहीच अधिकार नाहीये.” दरम्यान, गंभीरला विराटसोहतच्या या वादाविषयी अनेकदा प्रश्न विचारले गेले आहेत. प्रत्येक वेली गंभीरने विराटविषयी वैयक्तिक त्याच्या मनात काही नसल्याचे सांगतिले आहे. (The controversy with Virat is only on the field, explains Gautam Gambhir)
महत्वाच्या बातम्या –
MS Dhoni । आयपीएलसाठी थालाच्या तयारीला सुरुवात, निवृत्तीबाबत सीएसके सीईओ म्हणाले…
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! आयपीएल 2024 मधून हार्दिक घेणार माघार? जाणून घ्या कारण