भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सौरव गांगुलीची पहिली अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला आहे.
तसेच, गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असून एका रक्तवाहिनीत 90 टक्के ब्लॉकेज असल्याचीही माहिती समोर येत आहे. सध्या सर्जरीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवसांत त्याच्या हृदयात आणखी दोन स्टेंट टाकले जाऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.
विविध राजकीय नेत्यांकडून विचारपूस….
सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. यानंतर अनेकांनी त्याच्या तब्येतीबाबत अपडेट घेण्यासाठी त्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तसेच, विविध नेत्यांनी ट्विटद्वारे त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे.
गृहमंत्री अमित शाहा यांनी गांगुलीच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे की ‘गांगुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचे आणि रुग्णालयात भरती केल्याचे ऐकून वाईट वाटले. त्याच्या आरोग्यात लवकर आणि पूर्ण सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करते. माझ्या प्रार्थना त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या बरोबर आहेत.’
Sad to hear that @SGanguly99 suffered a mild cardiac arrest and has been admitted to hospital.
Wishing him a speedy and full recovery. My thoughts and prayers are with him and his family!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 2, 2021
याबरोबरच बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी ट्विट केले आहे की ‘मी त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मी त्याच्या कुटुंबाशी बोललो आहे. दादाची प्रकृती स्थिर असून तो उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहे.’
I wish and pray for the speedy recovery of @SGanguly99. I’ve spoken to his family. Dada is stable and is responding well to the treatment.
— Jay Shah (@JayShah) January 2, 2021
पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनीही गांगुलीच्या कुटुंबियांशी संवाद साधला असून गांगुलीच्या तब्येतीविषयी विचारपूस केली आहे.
आजी-माजी खेळाडूंनीही केली प्रार्थना
याशिवाय भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनीही गांगुलीची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली आहे.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ट्विट केले आहे की ‘दादा, तू लवकर बरा व्हावास, तुझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे.’
Wishing you a speedy recovery Dada, @SGanguly99 . Praying that you get well soon
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 2, 2021
भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की ‘तुझी प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना करतो. लवकर बरा हो.’
Praying for your speedy recovery. Get well soon 🙏 @SGanguly99
— Virat Kohli (@imVkohli) January 2, 2021
गांगुलीचा माजी संघसहकारी सचिन तेंडुलकरने गांगुलीबरोबरचा एक फोटो शेअर करत ट्विट केले की ‘नुकतेच सौरवच्या तब्येतीविषयी कळाले. आशा आहे की येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आरोग्यात सुधारणा करत राहो. लवकर बरा हो.’
Just got to know about your ailment Sourav.
Hope each passing day brings you closer to a full and speedy recovery! Get well soon. pic.twitter.com/NIC6pFRRdv— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 2, 2021
भारताचा माजी धाकड सलामीवीर विरेंद्र सेहवागने ट्विट केले की ‘दादा, लवकर बरा हो. तुझ्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो.’
Dada , jaldi se theek hone ka.
Praying for your quick and speedy recovery @SGanguly99 .— Virender Sehwag (@virendersehwag) January 2, 2021
याशिवाय हरभजन सिंह, मोहम्मद कैफ, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, शिखर धवन अशा अनेक क्रिकेटपटूंनी गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Praying for your speedy recovery Dada @SGanguly99 🙏 Get well soon.
— Shikhar Dhawan (@SDhawan25) January 2, 2021
Get well soon dada 💔💔💔💔 @SGanguly99 pic.twitter.com/swAZQlnXnO
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) January 2, 2021
I pray for your quick recovery. Get well soon @SGanguly99🙏🏻
— Kuldeep yadav (@imkuldeep18) January 2, 2021
Get well soon dada @SGanguly99
Wishing you a speedy recovery.— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) January 2, 2021
Wish you a very speedy recovery Dada. Get well soon!@SGanguly99
— DK (@DineshKarthik) January 2, 2021
A fighter on the field and you will be one off it as well🙏 . Get well soon @SGanguly99 dada
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 2, 2021
Get well soon Dada, gutted to hear about your cardiac arrest, hope you feel better @SGanguly99
— Mohammad Kaif (@MohammadKaif) January 2, 2021
Thinking of you @SGanguly99 Praying for your speedy recovery Dada🤗🤗
— VVS Laxman (@VVSLaxman281) January 2, 2021
Here's wishing the BCCI President @SGanguly99 a speedy recovery. https://t.co/EGTcOjtqxA
— BCCI (@BCCI) January 2, 2021
Former India captain and current BCCI President Sourav Ganguly suffered a mild cardiac arrest earlier today. He is now in a stable condition.
We wish him a speedy recovery! pic.twitter.com/HkiwFhjyih
— ICC (@ICC) January 2, 2021
Dada @SGanguly99 Get well soon 🙏🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 2, 2021
माध्यमांतील वृत्तानुसार गांगुलीला शनिवारी (२ जानेवारी) सकाळी त्याच्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटायला लागले होते. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच त्याच्या उपचाराला सुरुवात झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
“पाकिस्तानचे खेळाडू वाटतात १७-१८ वर्षाचे पण वास्तवात असतात २७-२८ वर्षांचे” पाकिस्तानी खेळाडूचाच दावा
जोर का झटका.! चाहत्याशी जवळीक भारतीय खेळाडूंना भोवली, रोहितसह ‘हे’ ५ जण पुन्हा आयसोलेशनमध्ये
मोठी बातमी! आधी दुर्लक्षित केलेल्या अर्जून तेंडुलकरचा आता मुंबई संघात समावेश