सध्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक (ICC Women’s T20 World Cup) सुरू आहे. त्यामध्ये भारतीय संघ रविवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध भिडणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवून न्यूझीलंडचा पराभव केला होता, आता सेमीफायनलमध्ये धडक मारण्याच्या आपल्या आशा संघाने बळकट केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचे 3 सामन्यात 6 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे, तर उर्वरित स्थानांसाठी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान शर्यतीत आहेत.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पाकिस्तानचा पराभव केला. पण क्षेत्ररक्षण करताना कर्णधार ॲलिसा हेलीच्या पायाला दुखापत झाली आणि वेगवान गोलंदाज टायला व्लेमिंकचा खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे रविवारच्या सामन्यात दोन्ही खेळाडू खेळणे अवघड आहे. भारताने श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला, जो स्पर्धेच्या इतिहासातील त्यांचा सर्वात मोठा विजय होता.
श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह भारत अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया शीर्ष स्थानी आहे. भारताचे गुणतालिकेत 4 गुण आहेत आणि बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. कारण न्यूझीलंडला अजून 1 सामना खेळायचा आहे आणि 6 गुणांसह संघ अंतिन 4 मध्ये पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत नेट रन रेटवर नजर टाकली जाईल. यावेळी भारताचा नेट रन रेट 0.567 आहे, तर न्यूझीलंडचा नेट रनरेट 0.050 आहे.
पाकिस्तानने 3 सामन्यात 2 गुण मिळवले आहेत, जर त्यांनी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले आणि भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला तर संघांचे 4 गुण होतील आणि तरीही प्रश्न नेट रनरेटचा असेल. त्यामुळे भारतीय संघाला मोठ्या फरकाने सामना जिंकण्याची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टाॅप-5 गोलंदाज
ind vs nz; कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान गमावलेले 3 प्रमुख खेळाडू
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार कोण? बीसीसीआयने स्पष्टचं दिले संकेत