भारतीय महिला फुटबॉल संघाच्या माजी मिडफिल्डर ओइनाम बेम बेम देवी या भारतातील महिला फुटबॉलच्या पाठीराख्या राहिल्या आहेत आणि भारतात महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.या स्पर्धेमुळे भारतात महिला फुटबॉलला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचाही विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला.
पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या बेम बेम देवी यांनी सांगितले की, ‘फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ स्पर्धेमुळे महिलांना फुटबॉल मध्ये करिअर घडविण्याची संधी असल्याचे पालकांना समजले आहे. तसेच या स्पर्धेमुळे महिला फुटबॉल क्षेत्र प्रकाशझोतात आले आहे.’
या भव्य अशा स्पर्धेमुळे भारतातील महिला फुटबॉलकडे होणाऱ्या बदलांविषयी बोलताना अर्जुन पुरस्कार विजेत्या बेमबेम देवी म्हणाल्या , “फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ ही स्पर्धा भारतात होणार असल्याचे जाहीर झाल्यापासूनच देशभरांतून अनेक महिला फुटबॉलपटूंच्या पालकांनी संपर्क साधून त्यांच्या मुलींना भारतीय संघापर्यंत पोहोचण्यासाठी कशी संधी मिळेल याविषयी चौकशी केली होती. तसेच, महिला फुटबॉल संघाच्या निवडीसाठी त्यामुळे सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध झाले आहेत.”
भारतातील महिला फुटबॉलविषयीच्या असलेल्या गुणवत्तेबाबत बोलताना बेम बेम देवी म्हणाल्या, “या जागतिक स्पर्धेमुळे भारतीय महिलांच्या जीवनशैलीत सकारात्मक सांस्कृतिक बदल घडून येतील”, असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय महिला फुटबॉलची दुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेम बेम देवी आपल्या चाहत्यांना व प्रेक्षकांना बोलताना पुढे म्हणाल्या की, “इतक्या उच्च दर्जाची स्पर्धा भारत प्रथमच आयोजित करीत असून भारतीय क्रीडा प्रेमींनी खेळाडूंना प्रचंड प्रोत्साहन व प्रतिसाद दिल्यास त्या सर्वोत्तम कामगिरी बजावू शकतील. या जागतिक करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युवा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी देशांतील क्रीडा प्रेमींना मोठ्या संख्येने स्टेडियम मध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहे. आम्ही सर्वजण एकत्रितणे खेळाडूंना आमचा पाठिंबा दाखवून दिला तर त्या खेळाडूंसुद्धा १००टक्क्यांपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवतील असेही त्यांनी सांगितले.”
या स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघ आ गटात असून मोरोक्को, ब्राझील आणि अमेरिका यांचाही या गटात समावेश आहे. फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषक करंडक 2022 स्पर्धा नवी मुंबई, गोवा आणि भुवनेश्वर अशा तीन ठिकाणी होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम या ठिकाणी होणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला सल्ला द्यायला सरसावला पुजारा; म्हणतोय,’तुम्ही हे काम करा’
याच चुकांमुळे थेट रोहितच्या नेतृत्वावरच उपस्थित होतायेत प्रश्न
‘राजा हा नेहमी राजाच असतो!’ आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान मिळाल्यानंतर रिजवानचे खास ट्वीट






