आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना भारतीय संघात घेतले गेले आहे. हे दोन्ही फलंदाज मागच्या मोठ्या काळापासून एकही प्रतिस्पर्धी सामना खेळले नाहीत. काही महिन्यांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हे दोघेही फिटनेसवर कम करत होते आणि आता त्यांनी फिटनेस मिळवल्याचे सांगितले गेले आहे. मात्र त्यांना आशिया चषकासाठी संधी मिळाल्यामुळे भारताचे विश्वचषकविजेते खेळाडू मदन लाल यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना फटकारले आहे.
सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) साठी भारताचा 17 सदस्यीय संघ घोषित केला गेला. मध्यक्रमातील फलंदाज म्हणून केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना संघात सामील केले गेले. मात्र, मागच्या मोठ्या काळापासून मैदानातून बाहेर असेलेल राहुल आणि अय्यर आशिया चषकात कसे प्रदर्शन करणार, याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहे. पण दुसरीकडे संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी या दोघांवर विश्वास दाखवला. जवळपास सात वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडर्त्यांनी संघ घोषित करताना पत्रकार परिषद आयोजित केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी सर्वा प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धथीने दिली. असे असले तरी, भारताला 1983 विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग राहिलेले मदन लाल (Madan Lal) यांनी यायबाबत राहुल आणि अय्यरच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त केली.
मदन लाला आशिया चषकासाठी संघ निवड झाल्यानंतर म्हणाले की, “केएल राहुल पूर्णपणे फिट आहे, असं संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना म्हणता येईल, असं मला वाटत नाही. राहुल फिट आहे की, त्याला फिटनेसचा अजूनही त्रास आहे, याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले नाहीये. संघात श्रेयस अय्यरही आहे आणि त्याच्या फिटनेसबाबत देखील काहीच स्पष्ट नाहीये. दोघांनी कोणताच प्रतिस्पर्धी सामना खेळला नाहीये. त्यांनी फिटनेस सिद्ध केल्यानंतरच त्यांना संघात घेतले पाहिजे. नेट्समध्ये फलंदाजी करणे आणि लाईव्ह सामन्यात खेळणे यात खूप फरक असतो.”
दरम्यान, पत्रकार परिषदेत राहुल आणि अय्यरबाबत प्रश्न विचारल्यानंतर आगरकर म्हणाले की, “श्रेयस अय्यरला पूर्णपणे फिट घोषित केले गेले आहे. राहुलच्या फिटनेसबाबत तक्रार आहे. ही त्याची आधिची दुखापत नाहीये. त्यामुळेच आम्हील संजू सॅमसन याला संघात राखीव खेळाडू म्हणून घेतले आहे. त्यामुळेच आम्हा सर्वांची इच्छा आहे की, राहुल पूर्णपणे फिट असावा. सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी नाही, तर किमान त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात तरी तो खेळळा पाहिजे.” संजू सॅमनसाल 17 सदस्यीय संघात निवडले गेले नाही म्हणून चाहत्यांमध्ये नराजी पाहायला मिळत होती. मात्र, निवडकर्त्यांच्या या विधानामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (The former cricketer lashed out at Rohit Sharma and Ajit Agarkar for taking KL Rahul to the Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा आहे तिलकची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम! युवा फलंदाजाकडून मिळालेल्या मदतीचा खुलासा
“आम्ही काही वेडेपणा करणार नाही”, ‘त्या’ प्रश्नावर रोहितने दाखवला अस्सल मुंबईकर अवतार