भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. ते दीर्घकाळ भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते आणि त्यांचे नाव जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये समाविष्ट केले जाते. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांनी 1967 ते 1979 दरम्यान भारतासाठी 67 कसोटी खेळले आणि 266 विकेट्स घेतल्या. त्यांनी 10 वनडे सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या होत्या.
India's legendary spinner Bishan Singh Bedi passed away.
– Condolences to his whole family & friends pic.twitter.com/PM3GG3l0lx
— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2023
बिशनसिंग बेदी, एरापल्ली प्रसन्ना, आणि एस वेंकटराघवन हे त्या काळचे भारतीय फिरकीचे महान त्रिकूट होते. भारताच्या पहिल्या एकदिवसीय विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमृतसरमध्ये जन्मलेल्या फिरकीपटू बिशनसिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केलेले. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 370 सामन्यांमध्ये 1,560 विकेट्स घेतल्या आहेत.
बिशनसिंग बेदी यांनी 31 डिसेंबर 1966 रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्स येथे आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली, तर ऑगस्ट-सप्टेंबर 1979 मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला.
तर, त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला वनडे सामना 13 जुलै 1974 रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता, तर शेवटचा एकदिवसीय सामना 16 जून 1979 रोजी मँचेस्टर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळला.
(The former India captain breathed his last at the age of 77 behind the curtain of time)