---Advertisement---

“धोनी नेहमीच संघात असणार नाही, कुलदीपला स्वत:चा मार्ग शोधावा लागेल”

On: शनिवार, जुलै 17, 2021 1:17 AM
Kuldeep Yadav, MS Dhoni and Virat Kohli
---Advertisement---

भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेला आहे, या संघात फिरकीपटू कुलदीप यादवची देखील निवड झालेली आहे. मागील अनेक दिवसांपासून कुलदीप खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी स्वत:ला पुन्हा सिद्ध करण्यासाठी श्रीलंकेचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, भारताचे माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू यांनी कुलदीप यादवच्या गोलंदाजीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

व्यंकटपती राजू  म्हणाले की, आता कुलदीप यादवला स्वत:ची रणनीती आखावी लागेल, कारण यष्टीरक्षण करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी सध्या संघांमध्ये नाही. त्यामुळे टी 20 विश्वचषक होण्यापूर्वी त्याला चांगल्या फॉर्ममध्ये परतण्याचा मार्ग स्वत: शोधावा लागेल. टी20 विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएई आणि ओमानमध्ये होणार आहे.

धोनी भारतीय संघात असताना कुलदीपने खूप वेगवान प्रगती केली होती, परंतु, धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर कुलदीपचा फॉर्म खराब झाला. ज्यामुळे तो कसोटी संघाबाहेर गेला. तसेच त्याला मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठीही भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

माजी राष्ट्रीय निवडकर्ता व्यंकटपती राजू यांनी सांगितले की, ‘श्रीलंकेतील खेळपट्ट्या मंद आहेत आणि कुलदीपला पुनरागमन करण्यासाठी हे फायद्याचे असेल. आयपीएल आणि टी20 विश्वचषकात युएईची खेळपट्टी कोरडी व फिरकीपटूंसाठी अनुकूल असतील तर कुलदीप सामना जिंकवू शकेल.’

धोनीची मोठी भूमिका
व्यंकटपती राजू पुढे म्हणाले की, “कुलदीपच्या प्रगतीसाठी कर्णधारांनी कशी मोठी भूमिका बजावली, हे आपल्या सर्वांना माहित आहे. तो नेहमीच असे म्हणत आला आहे की, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणे खूपच आरामदायक वाटले आहे. परंतु धोनी नेहमी त्याच्यासाठी संघात राहू शकत नाही. तर आपण आशा करूया की त्याने स्वतःच मार्ग शोधावा.”

व्यंकटपती राजू पुढे म्हणाले की, ‘तो अजूनही खूप चांगला गोलंदाज आहे. तो अजूनही तरूण आहे. जेव्हा तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव येतो ,तेव्हा तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे. तो नेहमीच विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. तो कधीही बचावात्मक गोलंदाज नव्हता.’

कुलदीपही आता श्रीलंकेत चांगली गोलंदाजी करुन चांगल्या फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘खेळाडूंनी स्वतःची जबाबदारी समजून घेतली पाहिजे’, भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने माजी खेळाडू गरजला

‘कोच’ राहुल द्रविडकडून श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या नितीश राणा आणि चेतन साकारियाला शिकायचेत ‘हे’ दोन गुण

जेव्हा केवळ १० वर्षांचा खेळाडू झाला होता ऑलिम्पिकमध्ये सामील, आजही त्याच्याच नावावर आहे ‘हा’ विक्रम 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---