मेरीलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने वनडे क्रिकेटविषयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीला महत्वाचा सल्ला दिल्याचे समजते. एमसीसीच्या मेत वनडे विश्वचषक 2027 नंतर आयसीसीने द्विपक्षीय वनडे मालिका बंद केल्या पाहिजे. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील लॉर्ड्स कसोटीदरम्यान एमसीसीकडून आयसीसीला हा सल्ला दिला गेला आहे. मात्र, विश्वचषक 2023 नंतर वनडे क्रिकेटच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होऊ शकते, असेही एमसीसीला वाटते.
एमसीसीने म्हटल्याप्रमाणे कसोटी क्रिकेटसमोर आपली आव्हाने आहेत. जगातील अनेक देश असे आहेत, जे पाच दिवसांच्या सामन्याचा खर्च उचलू शकत नाहीत. सोबतच त्यांनी झिम्बाब्वेचे उदाहरण दिले. जिम्बब्वे संघाने 2017 मध्येच निर्णय घेतला होता की, ते जास्तीत जास्त सामने विदेशात, म्हणजेच विरोधी संघाच्या यजमानपदामध्ये खेळतील. याच पार्श्वभूमीवर एमसीसीने असाही सल्ला दिला की, आयसीसीने कसोटी सामन्यांसाठी वेगळा निधी दिला पाहिजे.
वनडे क्रिकेटच्या भविष्यावर लवकरच मोठा निर्णय घोण्याची शक्यता आहे. मागच्या काही वर्षांपासून वनडे क्रिकेटचा चाहतावर्ग झपाट्याने कमी होताना दिसला आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये हा चाहतावर्ग विभागला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. खासकरून कोरोना साथीनंतर वनडे क्रिकेटला फटका बसल्याचे दिसले. येत्या कालात वनडे क्रिकेटला ब्रॉडकास्टरर्सच्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माध्यमांतील वृत्तांनुसार येत्या काळात दक्षिण आफ्रिकेच्या डरबन शहरात आयसीसीची बैठक आयोजित केली जाईल, ज्यामध्ये वनडे क्रिकेटविषयी महत्वाचे निर्णय घेतला जाऊ शकतो. आयसीसी सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिली गेली आहे की, वनडे विश्वचषक 2023 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जवळ आहे. पण तरीही चाहत्यांकडून वनडे क्रिकेटबाबत उत्सकुता दिसत नाही. खासकरून कोरोनानंतर चाहत्यांनी टी-20 क्रिकेटमुळे वनडे फॉरमॅटकडे उत्सकुता दाखवली नाहीये. असे असले तरी, भारतासारख्या देशात वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉपीसाठी चाहत्यांची गर्दी जमू शकते. वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी ही गर्दी महत्वाची ठरले, असे या सूत्राकडून सांगितले गेले.
दुसरीकडे आयसीसीच्या मते आता ब्रॉडकास्टर्स कसोटी आणि टी-20 मालिकांवर लक्ष केंद्रित करत आहेत. वनडे क्रिकेटसाठी ब्रॉडकास्टर्स जास्त उत्सुक दिसत नाहीत. अशात वनडे क्रिकेटचे भविष्य काय आहे, याविषयी डरबनमधील आयसीसीच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. (The future of ODI cricket is in danger! Bilateral series after 2027 is unlikely)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद