---Advertisement---

Video : कच्च्या रस्त्यावर द ग्रेट खलीची बुलेट रायडिंग

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 8:45 PM
---Advertisement---

भारतात डब्ल्यूडब्ल्यूई या खेळाला वलय मिळवून देणारा रेसलर दलीपसिंग राणा उर्फ द ग्रेट खली नेहमी चर्चेत असतो. डब्ल्यूडब्ल्यूईमधून निवृत्ती घेतल्यानंतर खाली भारतात राहून आपले कार्य करत आहे. खलीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो कच्च्या रस्त्यावरून मोटारसायकल चालवताना दिसतोय.

मोटारसायकल चालवताना दिसला खली

भारताचा पहिला डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार असलेला खली व्यवसायिक रेसलिंगमधून निवृत्त झाल्यापासून भारतात राहून युवा रेसलरना मार्गदर्शन करत आहे. कॉन्टिनेन्टल रेसलिंग एंटरटेनमेंट या अकादमीत तो युवा रेसलरना प्रशिक्षण देतो. सोबतच तो सामाजिक कार्यातही आघाडीवर असतो. खलीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ सार्वजनिक केला आहे. या व्हिडिओमध्ये खली एका कच्च्या रस्त्यावर मोटरसायकल चालवत आहे. खलीने या व्हिडीओखाली काही कॅप्शन दिले नाही मात्र, पार्श्वसंगीत म्हणून एक पंजाबी गाणे वाजत आहे. त्याचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत १४ मिलीयनपेक्षा अधिक लोकांनी पाहिला.

https://www.instagram.com/p/CKW7FrujJTb/?utm_source=ig_web_copy_link

डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आहे खली

डब्ल्यूडब्ल्यूईचा पहिला भारतीय चॅम्पियन म्हणून खलीला ओळखले जाते. सन २००७-२०१४ यादरम्यान त्याने डब्ल्यूडब्ल्यूईची रिंग गाजवली आहे. निवृत्तीनंतर त्याने काही हिंदी व पंजाबी चित्रपटात अभिनय देखील केला. सध्या भारतभर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने तो चर्चेत आला होता.

महत्वाच्या बातम्या:

भाऊ सॉरी ना..! फलंदाजाचं शतक अडवण्यासाठी पठ्ठ्याने टाकला वाईड बॉल, नंतर स्वत:च मागितली माफी

मोठी बातमी.! जय शाह यांची आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, २ नवख्या खेळाडूंना मिळाली जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---