भारतातील सर्वोत्तम रॅम क्वालिफायर, द डेक्कन क्लिफहँगर आणि 1750 किमी लांबीचा अल्ट्रा स्पाइस रेस यांच्यातर्फे द ग्रेट हिमालयन अल्ट्रा सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शरीयत 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर 2018 दरम्यान लेह येथेपार पडणार आहे.
ग्रेट हिमालयन अल्ट्रा सायकल शर्यत ही जगातील सर्वाधीक उंच्च स्थरावरील अल्ट्रा सायकल शर्यत आहे. 3500 मीटर उंची असलेल्याजगातील सर्वाधीक उंच पासेस असलेल्या लेह, लडाख येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. रॅम क्वालिफायर अल्ट्रा रेस मध्ये आजपर्यंत झालेल्या शर्यतींपेक्षा जास्त उंचीवर ही शर्यत होत आहे. ही स्पर्धा वैयक्तिक(सोलो) व सांघिक गटात होणार आहे.
स्पर्धेत स्पर्धकांना 600 कि.मीचा टप्पा पार करायचा आसून यामध्ये . स्पर्धकांना सपोर्ट वेहीकल आणि क्रु असणे आवश्यक आहे.हिमालयातील खडतर मार्ग पार करायचा आहे. शर्यतीची सुरूवात लेह येथून होऊन पुढे शर्यतीचा मार्ग जम्मू-काश्मीरमधील लडाख आणिकारगिलिग येथील नेत्रदीपक हिमालय पर्वतश्रेणीतून जाणारा एनएच1 या मार्गावरून असेल. हा मार्ग पुढे इन्ससच्या पठाराच्या खालीझान्स्कर येथे सामील होतो आणि एका नयनरम्य संगमावर सिंधू नदिचा रंग बदलतो जो स्पष्टपणे मार्गवरून दिसतो. पुढे कारगिल कडेजाणारा शर्यतीतील उताराचा टप्पा सूरू होतो. पुढे शर्यतीतील सर्वाधीक उंचीवरील मार्ग फॉटू येतो. ही अत्यंत अत्कंठा वर्धक शर्य आहे कारणशर्यतीत सर्वातीत कमी उंचीचा कारगिलचा 2600 मीटरचा टप्पा पार करून आता स्पर्धकांना शर्यतीततल सर्वात उंचीची फॉटू ला टॉप 4100मीटर उंचीचा टप्पा पार करायचा असतो.
स्पर्धेत पाचव्या मालीकेतील द डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेतील दुसरा क्रमांक पटकावणारा मुंबईचा कबीर राचुरे, सैन्यातील एव्हरेस्टसमिटीयर विशाल अहलावत, सुमित पाटील,अमित समर्थ यांसाऱखे दिग्गज सायकलपटु आपले कैशल्य पणाला लावणार आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चेसिंग हिमालयाजचे वसिम बारी, रोव्हर्स डेनच्या ग्रिष्मा सोले, लडाख ऑक्सिजन मॉन विकी नियाझ,लडाख ऑर्गेनीक फार्मर्स फाउंडेशनचे संस्थापक झुबीर अहमद, ट्रंप स्पोर्टस् वेअरचे संजन राणा यांचे सहकार्य लाभले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक
–एशियन गेम्स: डोळे मिटून १००मीटर शर्यत पूर्ण केली