न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू मिचेल सँटनरने पुन्हा एकदा आपले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सिद्ध केले आहे. यंदाच्या द हंड्रेड लीगमध्ये 29 वा सामना लंडन स्पिरिट आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स यांच्यात खेळला गेला. हा सामना 13 ऑगस्ट रोजी झाला. या सामन्यात नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळणाऱ्या मिचेल सँटनरने लंडन स्पिरिटचा सलामीवीर मायकेल पेपरचा असा शानदार झेल घेतला की सगळेच थक्क झाले.
नॉर्दर्न सुपरचार्जर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच लंडन स्पिरिटवर दबाव कायम ठेवला. त्यामुळे मायकेल पेपरला धावा काढण्यात अडचण येत होती आणि धावफलकावर दबाव वाढत होता. या दडपणामुळे पेपरने डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चेंडू नीट खेळू शकला नाही. ज्यामुळे चेंडू हवेत उडाला पण अंतर पार करता आले नाही.
मिड ऑनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या मिचेल सँटनरने चटकन लाँगऑनच्या दिशेने धाव घेतली आणि हवेत उडी मारत हा अविश्वसनीय झेल घेतला. त्याचा अप्रतिम झेल पाहून मैदानात उपस्थित प्रेक्षक आणि सहकारी खेळाडू थक्क झाले.
Mitchell Santner, that is UNBELIEVABLE 🤯
Enjoy every angle of 𝘵𝘩𝘢𝘵 catch 👇#TheHundred | #RoadToTheEliminator pic.twitter.com/oJupXTP3hR
— The Hundred (@thehundred) August 13, 2024
मिचेल सँटनरने केवळ फिल्डिंगमध्येच उत्कृष्टता दाखवली नाही तर चमकदार गोलंदाजीही केली. त्याने 15 चेंडूत केवळ 14 धावा दिल्या, ज्यमुळे लंडन स्पिरिटचे फलंदाज दडपणाखाली आले. लेगस्पिनर आदिल रशीदनेही चमकदार कामगिरी करत 16 धावांत 3 बळी घेतले. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे लंडन स्पिरिट संघाला 8 विकेट्स गमावून केवळ 111 धावा करता आल्या. या कामगिरीसाठी आदिल रशीदला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
हेही वाचा-
भारताच्या माजी क्रिकेटपटूला मिळाली मोठी जबाबदारी, या राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
‘केएल राहुल जगातील सर्वोत्तम…’ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल
17 वर्षांचा सचिन सर्वांना पुरून उरला! आजच्याच दिवशी ठोकलं होतं कारकिर्दीतील पहिलं शतक