---Advertisement---

‘कॅप्टनकूल’ धोनीची बाजी! टी२० पाठोपाठ आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम वनडे संघाचाही कर्णधार

On: रविवार, डिसेंबर 27, 2020 4:44 PM
---Advertisement---

आयसीसीने रविवारी(२७ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम संघांची आणि सहसदस्य देशांच्या सर्वोत्तम खेळडूंच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या दशकातील सर्वोत्तम वनडे संघाचे कर्णधारपद भारताचा माजी यष्टीरक्षक कर्णधार एमएस धोनीला बहाल करण्यात आले आहे. याशिवाय आणखी २ भारतीय क्रिकेटपटूंचाही या वनडे संघात सामावेश आहे.

आयसीसीच्या निवड समीतीने हा संघ निवडण्यासाठी १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० हा कालावधी लक्षात घेतला आहे. याशिवाय या कालावधीत ५ वर्षे खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाच संघात स्थान दिले आहे.

आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे संघात सलामीवीर म्हणून भारताच्या रोहित शर्मासह ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नची निवड केली आहे. तसेच भारताचा सध्याच्या कर्णधार विराट कोहलीला या संघात तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे. चौथ्या क्रमांकावर आयसीसीने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सची निवड केली आहे.

तसेच ५ व्या क्रमांकावर बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनची निवड झाली आहे. ६ व्या क्रमांकासाठी धोनीची निवड झाली असून त्याच्याकडे नेतृत्वाबरोबरच यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे.

आयसीसीच्या या वनडे संघात ७ व्या क्रमांकावर अष्टपैलू बेन स्टोक्सने स्थान मिळवले आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांचा समावेश आहे.

धोनी, रोहित, विराटला टी२० संघातही स्थान –

भारताच्या धोनी, विराट आणि रोहित या तीन खेळाडूंना वनडे बरोबरच आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम टी२० संघातही स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या टी२० संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून धोनीचीच निवड झाली आहे. या शिवाय भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही या संघात समावेश आहे.

असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम वनडे संघ –

रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिविलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी(यष्टीरक्षक/कर्णधार) , बेन स्टोक्स, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा.

असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम टी२० संघ –

रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

महत्त्वाच्या बातम्या –

आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कोहलीच ‘किंग’; ‘या’ भारतीय फिरकीपटूलाही मिळाले स्थान

कोणत्याच भारतीय क्रिकेटरने केला नव्हता तो विक्रम रहाणेने करुन दाखवला!

NZ vs PAK : पहिल्या डावात न्यूझीलंडचा ४३१ धावांचा डोंगर, प्रत्युत्तरात पाकिस्तानची अडखळती सुरुवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---