आयसीसीने रविवारी(२७ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम संघांची आणि सहसदस्य देशांच्या सर्वोत्तम खेळडूंच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या दशकातील सर्वोत्तम टी२० संघाचे कर्णधारपद भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त आणखी तीन भारतीय खेळाडूंनाही या संघात स्थान मिळाले आहे.
धोनीशिवाय सलामीवीर रोहित शर्मा, विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूंचा आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम टी२० संघात समावेश आहे.
तसेच या संघात वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डलाही संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचचाही संघात समावेश आहे. त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा ग्लेम मॅक्सवेलही या संघात आहे.
याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सचाही या संघात समावेश असून त्याला ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ठेवण्यात आले आहे. गोलंदाजांमध्ये बुमराह शिवाय राशिद खान आणि लसिथ मलिंगा यांना सामील करण्यात आले आहे.
धोनीवर नेतृत्वाबरोबरच यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली २००७ चा पहिला टी२० विश्वचषक भारताला जिंकून दिला आहे.
आयसीसीच्या निवड समीतीने हा संघ निवडण्यासाठी १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० हा कालावधी लक्षात घेतला आहे. याशिवाय या कालावधीत ५ वर्षे खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाच संघात स्थान दिले आहे.
The ICC Men's T20I Team of the Decade. And what a team it is! ⭐
A whole lot of 6️⃣-hitters in that XI! pic.twitter.com/AyNDlHtV71
— ICC (@ICC) December 27, 2020
असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम टी२० संघ –
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
महत्त्वाच्या बातम्या –
पाहुणा नंबर १..! मेलबर्नच्या मैदानावर ‘अशी’ कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे पहिलाच परदेशी क्रिकेटर
व्वा रे अजिंक्य! भारतात तर केलीच पण या ५ देशातही ठोकलीत दमदार शतकं
भारीच! मेलबर्नच्या मैदानावर शतक करणारा रहाणे केवळ दुसराच भारतीय कर्णधार; पाहा पहिलं नाव कुणाचं