क्रिकेटच्या विश्वात मैदानावर अनेक प्रकारच्या घटना घडताना आपण पाहिले आहे. अशीच एक घटना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात सेंट लुसियामध्ये चालू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान घडली. पहिला कसोटी सामना चालू होता आणि सामन्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली. वेस्ट इंडीजचा वरच्या क्रमांकाचा फलंदाज एनक्रुमाह बॉनरला दुखापत झाली. त्यामुळे तो डावाच्या बाहेर गेला. त्याच्या दुखापतीमागचे कारण दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज एनरिक नॉर्खिया ठरला.
त्याचे झाले असे, दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज एनरिक नॉर्खियाचा वेगवान चेंडू एनक्रुमाह बॉनरच्या हेल्मेटवर चेंडू लागला. त्यानंतर त्याला डोकदुखी सुरू झाली आणि मैदानावरच हलकीशी चक्कर आली. थोड्या वेळाने तो स्थिरावला आणि त्याने फलंदाजी केली. परंतु दक्षिण आफ्रिकाच्या डावात तो मैदानाबाहेर बसला. बॉनरच्या जागी काइरन पॉवेलला क्षेत्ररक्षणासाठी पाठवले गेले.
वेस्ट इंडीजचा एनक्रुमाह बॉनरसोबत ही घटना 12 व्या षटकाच्या दरम्यान घडली. शे होप बाद झाल्यानंतर एनक्रुमाह बॉनर फलंदाजी करायला मैदानात उतरला होता. नॉर्खिया गोलंदाजी करत होता. त्याने 143 किमी प्रती तासाच्या वेगाने चेंडू टाकला. तो चेंडू जाऊन बॉनरच्या हेल्मेटवर जोराने धडकला. बॉनरने हेल्मेट काढले. त्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली. चक्कर येऊनही तो मैदानावर खेळत होता. दुखापतीनंतर बॉनरने 31 चेंडू खेळले. अखेर बॉनरचा रबाडाने बळी घेतला. त्याने अवघ्या 10 धावा केल्या.
एनक्रुमाह बॉनर बाद झाल्यानंतर तो बाहेर गेला. त्याला डोकेदुखी चालू झाली त्यामुळेच त्यालानंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरवले नाही. काइरन पॉवेलला बॉनरची जागी घेतले. आता यानंतर पुढील डावात बॉनरच्या जागी काइरन पॉवेल हा फलंदाजी करणार आहे.
https://twitter.com/windiescricket/status/1403055417677258754?s=20
या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजचा पहिला डाव दक्षिण आफ्रिकेने 40.5 षटकांमध्ये अवघ्या 97 धावात गुंडाळला आहे. वेस्ट इंडीजचे 6 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगीडीने 19 धावांत 5 बळी घेतले. एनरिक नोर्खियाने 4 बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराटने आम्हाला सांगितलंय, कसोटी चॅम्पियनशीप एक महिन्याची नव्हे २ वर्षांची मेहनत”
वय विसरा! जेव्हा धोनीने दिली होती १२ वर्षे लहान असलेल्या हार्दिकला धावण्याच्या शर्यतीत मात
अनुष्काच्या कॉफीवरुन टीका, पण ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्यावर कौतुक नाही- माजी निवडकर्ता






