---Advertisement---

मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ‘या’ भारतीय फलंदाजाला झाली कोरोनाची लागण

On: गुरूवार, नोव्हेंबर 19, 2020 9:54 AM
---Advertisement---

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. खेळाडूदेखील यातून सुटू शकले नाहीत. आता बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन देखील कोरोनाच्या तावडीत सापडला आहे. अभिमन्यू बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि आता पुढील दोन आठवड्यांसाठी त्याला वेगळे ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे आता 24 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बंगाल टी -20 चॅलेंजमध्ये खेळण्याची त्याची शक्यताही फारच कमी असल्याचे दिसत आहे. ही स्पर्धा 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तो या स्पर्धेत पूर्व बंगालचे प्रतिनिधित्व करणार आहे. पण सध्या त्याला दोन आठवड्यांचा क्वारंटाईन करण्यात आल्याने तो या स्पर्धेचे कमीतकमी सुरुवातीचे सामने तरी मुकणार आहे.

कॅबचे संयुक्त सचिव देबब्रत दास म्हणाले की, अनिवार्य कोरोना चाचणीत तो पोझीटिव्ह आढळला आहे. त्याला आता क्वारंटाईन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अभिमन्यू बंगालच्या पूर्व प्रशिक्षण सत्राशी जोडला गेला होता.

25 वर्षीय अभिमन्यूने आत्तापर्यंत 64 प्रथम श्रेणी सामन्यात 4401 धावा केल्या आहेत. तर 57 अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांत 2656 धावा केल्या आहेत. तसेच तो 19 ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात 471 धावा केल्या असून यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आर अश्विनने घेतल्यात दिग्गजांच्या विकेट्स, तर त्याला भारतीय टी20 संघात मिळावे स्थान, पाहा कोण म्हणतंय

भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना ऍडिलेड येथे होणार नाही? जोश हेझलवूडने दिली माहिती

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानावर एकत्र खेळू शकत नाही बुमराह आणि शमी; जाणून घ्या कारण

ट्रेंडिंग लेख –

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---