---Advertisement---

‘कांस्य पदका’साठी जर्मनीशी भिडणार भारताचा हॉकी संघ, पाहा कधी आणि किती वाजता होणार लढत?

---Advertisement---

सध्या सर्वत्र टोकियो ऑलिम्पिक २०२० चा थरार सुरू आहे. या ऑलिम्पिकमधील उपांत्य सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी बेल्जियम संघाकडून पराभूत झाला. त्यामुळे आता भारताचा संघ जर्मनीशी कांस्य पदकासाठी आमने सामने येणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने जर्मनीचा ३-१ असा पराभव केला आहे. त्यामुळे आता जर्मनी भारताशी दोन करेल.

भारत आणि जर्मनी यांच्यात कांस्य पदकाचा सामना ५ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. हा सामना सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले होते आणि संघाने त्यांच्या आठ सुवर्ण पदकापैकी शेवटचे सुवर्ण पदक जिंकले होते. यानंतर आता भारतीय पुरुष संघाला पदक जिंकण्याची संधी मिळाली आहे.

असा झाला भारताचा उपांत्य फेरी सामना
या अगोदर बेल्जियमने भारतीय पुरुष हॉकी संघाचे ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न तोडले आहे. या सामन्यात भारतीय संघ आघाडीवर होता. परंतु शेवटच्या ११ मिनिटात त्यांनी ३ गोल हातून घालवले आणइ एलेक्डजेंडर हेंड्रिक्सने केलेली हॅट्रिक भारतासाठी महागात पडली. विश्वविजेत्या बेल्जियमकडून हेंड्रिक्स व्यतिरिक्त लॉईक फॅनी लुपर्ट आणि जॉन डोहमन यांनीही गोल केले. भारतासाठी हरमनप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला आणि मनदीप सिंगने आठव्या मिनिटाला गोल केला होता.

बेल्जियमने पेनल्टी कॉर्नरवर चार गोल केल्याने उपांत्य फेरीतील पराभवाला भारतीय संघ जबाबदार ठरला. जागतिक चॅम्पियन्सने भारतीय संरक्षण रेषेवर सतत दबाव ठेवला आणि १४ पेनल्टी कॉर्नर मिळवले, त्यापैकी ४ गोलमध्ये रूपांतरित झाले. बेल्जियमची रणनीती सुरुवातीपासूनच भारतीय वर्तुळात घुसून पेनल्टी कॉर्नर मिळवण्यासाठी स्पष्ट होती. कारण हेंड्रिक्स आणि लुपर्ट हे दोन पेनल्टी कॉर्नर तज्ञ आहेत. त्यांनी ही रणनीती चांगल्याप्रकारे अंमलात आणली. भारताला पाच पेनल्टी कॉर्नरही मिळाले पण त्यापैकी फक्त एक गोल झाला होते.

असा झाला जर्मनीचा उपांत्य सामना
त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी संघात झालेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ व्या मिनिटाला टीम ब्रँडच्या गोलने खाते उघडले. त्यानंतर जर्मनीने लुकास विंडफेडरच्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून बरोबरी साधली. पण ऑस्ट्रेलियन संघाने लवकरच प्रत्युत्तर दिले. ब्लेक गोवर्सने त्याच्यासाठी गोल केला आणि अर्ध्या वेळेत संघाला २-१ ने पुढे नेले. हाफ टाइमनंतर थोड्याच वेळात लकलन शार्पने गोल करून संघाचा विजय निश्चित केला. यानंतर जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला पण ऑस्ट्रेलियाने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही.

बेल्जियम अन् ऑस्ट्रेलियात होणार महामुकाबला
त्याचबरोबर अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा संघ बेल्जियमसोबत खेळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत बेल्जियमने भारताचा ५-२ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने जर्मनीला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. बेल्जियम रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेता आहे आणि त्यांनी सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर गेल्या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला एकही पदक जिंकता आले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या-

दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव

‘पंतप्रधान मोदी कृपाकरून भारतीय संघाचे सामने पाहू नका’, चाहत्यांची सोशल मीडियावरून मागणी

सामान्य शेतकऱ्याची मुलगी, हॉकीसाठी घरापासून राहिली दूर; आता ऑलिंपिकमध्ये घडवला इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---