India Squad For England Tour 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा (24 मे) रोजी होणार आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, (24 मे) रोजी टीम इंडियाची घोषणा केली जाईल आणि शुबमन गिलला कसोटी संघाचा कर्णधार घोषित केले जाऊ शकते. (India Test Captain Shubman Gill) रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटीतून निवृत्तीनंतर कसोटी कर्णधारपदासाठी गिलचे नाव चर्चेत आहे. (24 मे) रोजी दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषदेद्वारे भारतीय संघ आणि नवीन कर्णधाराची घोषणा केली जाणार आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण ही पत्रकार परिषद लाईव्ह कुठे पाहायची याबद्दल जाणून घेऊयात.
(24 मे) रोजी मुंबईतील बीसीसीआय (BCCI) मुख्यालयात बैठक बोलावण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे, ज्यामध्ये चर्चेनंतर दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते. अलिकडेच कर्णधारपदाबाबत जसप्रीत बुमराहच्या नावाचीही चर्चा सुरू होती, परंतु फिटनेसशी संबंधित समस्यांमुळे बुमराह इंग्लंडविरुद्धच्या सर्व 5 कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही अशी अटकळ आहे.
येथे पाहता येणार लाईव्ह पत्रकार परिषद
उद्या (24 मे) भारतीय संघाची घोषणा स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह असणार आहे. Jio hotstar, Star sports 1, Star sports 1 Hindi, Star sports 2, Star sports 2 Hindi या चॅनलवर भारतीय संघाची घोषणा लाईव्ह दिसणार आहे. (Indian Squas Announcement Live On Star Sports Tommorow)






