सध्या इंग्लंडचा पाकिस्तान दौरा सुरू आहे. दरम्यान दोन्ही संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला कसोटी सामना मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या संघाने पाकिस्तानवर एक डाव राखून आणि 47 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लडने या धमाकेदार विजयासह 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाकिस्तानने 556 धावा केल्या होत्या, मात्र असे असतानाही त्यांना एक डाव, 47 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या डावात 550 हून अधिक धावा करणारा पाकिस्तान कसोटी इतिहासातील पहिला संघ ठरला, परंतु त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पराभूत संघांमध्ये पाकिस्तान शीर्ष स्थानी पोहोचला आहे.
पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करून पराभूत होणारा ऑस्ट्रेलिया हा कसोटी क्रिकेट इतिहासातील दुसरा संघ आहे. ऑस्ट्रेलियासोबत असे 3 वेळा घडले आहे, जेव्हा त्यांनी पहिल्या डावात 500 हून अधिक धावा केल्या. पण त्यांना पराभव टाळता आला नाही. त्याचबरोबर या बाबतीत इंग्लंड, न्यूझीलंड संघ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांनी पहिल्या डावात 2 वेळा 500 हून अधिक धावा केल्या, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
बांगलादेश संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 2 वेळा 500 हून अधिक धावा केल्या, पण तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या यादीत भारतीय संघाचा समावेश नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने कधीही 500 हून अधिक धावा करून सामना गमावला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
डीएसपी झालेल्या मोहम्मद सिराजची कुठे होणार पोस्टिंग?
IPL Auction 2025; मेगा लिलावात लखनऊचे ‘हे’ स्टार खेळाडू ठरणार अनसोल्ड?
IND vs NZ; “लढण्यासाठी आम्ही सज्ज…” कसोटी मालिकेपूर्वीच कर्णधाराचे मोठे वक्तव्य