---Advertisement---

नागपूरमध्ये भारताचे पारडे जड! कसोटीच्या पहिल्या डावात घेतली तब्बल ‘इतक्या’ धावांची आघाडी

On: शनिवार, फेब्रुवारी 11, 2023 11:39 AM
Axar Patel Ravindra Jadeja
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचे पारडे जड दिसले. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 177 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तार भारतीय संघाने मात्र ऑस्ट्रेलियावर मोठी आघाडी मिळवली. भारताचा पहिला डाव 400 धावांवर संपला. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा 223 धावांनी आघाडीवर आहे.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. पण भारतासाठी मात्र कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शतक ठोकले. त्याचसोबत अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी अर्धशतकीय योगदान दिले. जडेजाने गोलंदाजाच्या रूपात संघासाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्यानंतर फलंदाजाच्या रूपात त्याने 70 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच अक्षर पटेलने 84 धावा कुटल्या.

रोहित शर्माने या सामन्यात शतक ठोकले आणि कर्णधारपदाला साजेशी खेळी साकारली. रोहितने या सामन्यात एकूण 212 चेंडूंना सामोरे गेला आणि यात 120 धावा ठोकल्या. या धावा रोहितने 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने कुटल्या. सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या खेळाडूंनी नागपूरमध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात कोणताही खेळाडू चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असतो, पण सूर्यकुमार आणि भरत मात्र पहिल्या डावात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. दोघांनी प्रत्येकी आठ-आठ धावांची खेळी करून विकेट गमावल्या.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचा युवा फिरकी गोलंदाज टॉड मर्फी () याने मात्र भारतीय संघाचा घाम काढला. मर्फीने पहिल्या डावात 47 षटके गोलंदाजी केली आणि यात 124 धावा खर्च करत सात विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने रोहित शर्मा आणि अक्षर पटेल या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. (The Indian team took a lead of 223 runs over Australia in first inning od Nagpur test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

फ्लॉप होऊनही राहुलला फलंदाजी प्रशिक्षकाचा भक्कम पाठिंबा का? म्हणाले, ‘केएलसाठी प्रामाणिकपणे सांगतो…’
‘मुंबईचे माजी खेळाडू साऊथच्या खेळाडूंना चांगलं बोलत नाहीत’, भारतीय दिग्गजाचा मांजरेकरांवर गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---