---Advertisement---

२०२२ मध्ये रोहित पर्व! नेतृत्व हाती घेताच मिळवून दिला वर्षातील पहिला विजय

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 12:57 AM
hitman-45
---Advertisement---

कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) याच्या नेतृत्वातील भारताच्या एकदिवसीय संघाने रविवारी (६ फेब्रुवारी) वेस्ट इंडीजला धूळ चारून विजय मिळवला. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. एकदिवसीय संघाच्या नियमित कर्णधाराच्या रूपातील रोहितचा हा पहिला सामना होता आणि यामध्ये त्याला विजय मिळला आहे. भारताने सहा विकेट्स राखून विजय मिळवला.

रोहित शर्मासाठी वेस्ट इंडीविरुद्धच्या मालिकेतील हा पहिला सामना खास होता. रोहिने यापूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. पण, नियमित कर्णधाराच्या रूपातील हा त्याचा पहिला एकदिवसीय सामना ठरला आणि यामध्ये भारताला विजय मिळाला. एवढेच नाही, तर खास गोष्ट तर ही आहे की, रोहितने ही नवीन भूमिका हातात घेताच संघाला २०२२ मधील पहिला विजय मिळला आहे. २०२२ मध्ये रोहितने खेळलेला हा पहिलाच सामना आहे. या सामन्यापूर्वी भारताने यावर्षी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पाच सामने खेळले, पण एकातही विजय मिळवता आला नाही. रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सहभागी झाला नव्हता.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दक्षिण अफ्रिका दौऱ्यात केएल राहुलने एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले होते. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला ०-३ अशा पराभव मिळाला होता. त्यापूर्वी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने संघाचे नेतृत्व केले. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता, पण हा सामना मागच्या वर्षी म्हणजेच डिसेंबर महिन्यात खेळला गेला होता. त्यानंतर कसोटी मालिकेतील पुढचे दोन सामने २०२२ मध्ये खेळळे गेले आणि दोन्हीमध्ये भारतीय संघ पराभूत झाला. या दोन कसोटी सामन्यांपैकी एकामध्ये विराटने नेतृत्व केले होते, तर एकात विराटच्या अनुपस्थित केएल राहुल कर्णधार होता.

एकंदरीत पाहता २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. पण रोहितने संघात पुनरागामन करताच भारत विजयी झाला आहे. रोहितचा पायगुण भारतीय संघासाठी चांगला ठरला आहे. वेस्ट इंडीविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ९, तर तिसरा सामना ११ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळली जाईल.

महत्वाच्या बातम्या –

यश धूल आणि कंपनीला विश्वचषकादरम्यान ‘ही’ गोष्ट खाण्यास घातली गेलेली बंदी

वर्षभरापूर्वी वाटलेले कारकीर्द संपणार; आता पठाण बंधूंच्या पाठींब्याने हुडा खेळला भारतीय संघात

कोरोनासारख्या संकटांवर मात करत यश धूलच्या भारतीय संघाने जिंकला विश्वचषक, वाचा संघाचा संपूर्ण प्रवास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---