अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळाला गेला. हा सामना भारताचा १००० वा वनडे सामना होता. या सामन्यात रोहित शर्माने पहिल्यांदाच पूर्णवेळ एकदिवसीय कर्णधार म्हणून मैदानात प्रवेश केला. विराट कोहलीनंतर त्याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
विराट कोहलीने गेल्या वर्षी टी२० कर्णधारपद सोडले. यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि नवा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली. विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माला रविवारी अहमदाबादमध्ये पहिल्या सामन्यात खूप मदत केली. तो त्यला क्षेत्ररक्षण सजवताना सल्ला देताना दिसला. तसेच डीआरएस घेतानाही विराट कोहलीचे मत उपयोगी पडले.
या सामन्यादरम्यानचे विराट आणि रोहित शर्माचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघांमधील जवळीक स्पष्टपणे दिसत होती. या दोघांसाठी कर्णधारपद नाही तर जिंकणे महत्त्वाचे आहे, हे या फोटोंवरून दिसून आले. कधी कधी दोन्ही खेळाडू मैदानावर एकत्र गप्पा मारताना दिसले आणि विकेट पडल्यावर सूद्धा दोघेजण एकत्र सेलिब्रेशन करताना दिसले.
२० व्या षटकात विराट आणि रोहित शर्मा जबरदस्त सेलिब्रेशन करताना दिसले. चहलने कायरन पोलार्डला बाद केले, तेव्हा विराट आणि रोहित खूप आनंदी दिसले. या प्रसंगी विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्याने दु:खी आहे आणि रोहितला कमान मिळाल्याने आनंद झाला आहे, असे दिसले नाही.
२२ व्या षटकात विराट कोहलीच्या सांगण्यावरून कर्णधार रोहित शर्माने चहलच्या चेंडूवर डीआरएस घेतला. चहल गोलंदाजी करत असताना ब्रूक्सच्या बॅटला लागून चेंडू थेट यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला. तरीसुद्धा अंपायरने त्याला बाद केले नाही. विराट कोहलीने डीआरएस मागितला. त्याच्या मते चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला होता. रोहित शर्माने डीआरएस घेतला आणि ब्रूक्स बाद झाला. विराट कोहलीचा हा निर्णय योग्य ठरला गेला.
महत्वाच्या बातम्या-
केवळ ८ धावा करूनही कोहली बनला आणखी एका विक्रमाचा ‘किंग’ (mahasports.in)
…म्हणून लतादीदींसाठी भारताच्या प्रत्येक सामन्यात दोन तिकिटे राखीव असायची (mahasports.in)