भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दोन देशांमध्ये सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यानंतर आता मालिकेतील दुसऱ्याही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत भारतीय संघावर २-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने अंतिम चेंडूवर विजय मिळवला असून त्याबाबत भारतीय चाहते नाराज दिसत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंतिम चेंडूवर पंचांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय संघाचे चाहते नाराज झालेले दिसत आहेत. सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अंतिम चेंडूवर तीन धावांची आवश्यकता होती आणि निकोला क्रिजवर फलंदाजीसाठी उपस्थित होती. तसेच गोलंदाज झूलन गोस्वामी अंतिम षटकात भारतासाठी गोलंदाजी करत होती. झूलनने टाकलेल्या शेवटचा चेंडू फुल टाॅस पडला आणि त्यावर निकोलाचा शाॅर्ट स्क्वेअर लेग वर उभी असलेल्या खेळाडूच्या हातात झेल गेला आणि त्या खेळाडूने तो पकडला. झेल पकडल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडू दोन धावांनी विजय झाल्याचा आनंद व्यक्त करू लागल्या होत्या. अशातच पंचांनी चेंडू नो बाॅल आहे का, हे चेक केले.
No ball? Y/N#AUSvIND pic.twitter.com/QP70Obgqbl
— cricket.com.au (@cricketcomau) September 24, 2021
पंचांनी नो बॅल चेक केल्यानंतर मात्र चित्र पालटले आणि नंतर चेंडू कंबरेच्यावर होता असे ठरवले आणि नो बॉलचा निर्णय दिला. त्यामुळे हा चेंडू पुन्हा टाकावा लागला आणि या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने दोन धावा घेत सामना नावावर केला. पंचांनी दिलेल्या या नो बॉलच्या निर्णयानंतर भारतीय चाहते चांगलेच निराश झालेले दिसले आहेत. चाहत्यांनी या निर्णयाविषयी त्यांच्या मनातील राग ट्विटरवर व्यक्त केलेला दिसत आहे. चाहत्यांच्या मते फलंदाज शेवटच्या चेंडूवर खाली वाकली होती. त्यामुळे नो बॉलचा प्रश्नच उद्भवत नाही. जर फलंदाजी करणारी खेळाडू खाली वाकून खेळत असेल, तर येणार प्रत्येक चेंडू नो बॉल प्रमाणेच वाटेल. फलंदाजी करणाऱ्या खेळाडूच्या उंचीचा विचार केला, तर चेंडू योग्य होता असे चाहत्यांचे मत आहे. ट्विटरवर याविषयी विवाद निर्माण झाला आहे.
चाहत्यांनी ट्विटरवर याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिले आहे की, काय नो बाॅल? मला वाटते आजचा नो बाॅल पंचांचा काॅल होता.
https://twitter.com/Shashan30051865/status/1441432827455688707
दुसऱ्या एकाने लिहिले की, नो बाॅलने ऑस्ट्रेलियाला वाचवले, हा योग्य चेंडू होता.
No ball save Australia ❤️ it is fair delivery
— Rishi❤️ (@Rajatbajpai6) September 24, 2021
तसेच एकाने असेही लिहिले की, बोलण्यासठी माफी मागतो, येथे जज करण्यासाठी दिग्गज आहेत, पण हा नो बॉल नव्हता, तिसऱ्या पंचानेही निर्णय देण्यासाठी खूप वेळ लावला.
It was not a no ball for waist height Lisa, anyways it's over now
— Nikhil Shivhare 🇮🇳🇮🇳(मोदी जी का परिवार) (@DrNikhilShivha3) September 24, 2021
अशाप्रकारच्या अनेक पोस्ट सध्या ट्वीटरवर ट्रेंड करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-आज रंगणार आयपीएल उत्तरार्धातील पहिले ‘डबल हेडर’; युवा राजस्थानसमोर अनुभवी दिल्लीचे आव्हान
-सीएसकेविरुद्धच्या एका अर्धशतकाने कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमांची नोंद