---Advertisement---

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथची रंजक कहाणी, भांडणापासून मैत्रीपर्यंत! पहा एका क्लिकवर

Virat Kohli Steve Smith
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला कारण दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा 15 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीतील भांडणापासून ते मैत्रीपर्यंतच्या प्रवासाची रंजक कहाणी जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या 15 वर्षांत विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे क्रिकेटचे दिग्गज खेळाडू म्हणून उदयास आले आहेत. अलिकडेच, जेव्हा भारत-ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीचा सेमीफायनल सामना झाला, तेव्हा विराट आणि स्मिथमध्ये मैत्रीपूर्ण वागणूक दिसून आली. पण एक काळ असा होता जेव्हा दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते. अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वर्षानुवर्षे दोघांमधील मैत्री कशी वाढत गेली आहे हे दिसून येते.

2016 साल होते जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. पहिला टी20 सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथ 21 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथचा झेल टिपला. चेंडू पकडल्यानंतर विराटने हाताने इशारा केला ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला. त्या वादग्रस्त हावभावावर स्मिथने म्हटले होते की विराटने असे करण्याची गरज नाही. विराटने केलेल्या हावभावावरून असे दिसून आले की तो सामन्यादरम्यान स्मिथच्या वारंवार स्लेजिंगवर नाखूष होता.

मंगळवारी (4 मार्च), चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा सेमीफायनल सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कांगारू संघाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारताने 4 विकेट्स शिल्लक असताना सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश केला.

या सामन्यानंतर विराट आणि स्मिथची मैत्रीपूर्ण शैली पाहायला मिळाली. दोघांनी एकमेकांना मिठी मारली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाले. या सेमीफायनल सामन्यानंतर स्टीव्ह स्मिथने आपल्या वनडे कारकिर्दीचा अंत केला आहे. त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो टी20 आणि कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

CT 2025: भारताने केला ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला संघ
फॅनच्या विनंतीवर आनंद महिंद्रांनी दिली मजेशीर प्रतिक्रिया, भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याशी संबंधित प्रकरण
SA vs NZ: न्यूझीलंडचा विक्रमी स्कोअर, दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे मोठे लक्ष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---