भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. शुक्रवारी (15 डिसेंबंर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने धोनीच्या सन्मानार्थ मोठा निर्णय घेतला. धोनीची 7 क्रमांकाच जर्सी यापुढे कुठल्याच भारतीय क्रिकेटपटूला घालता येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्याचसोबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला एक निर्णय धोनीच्या नावावर लागलेगा डाग सुरणारा ठरला.
एमएस धोनी (MS Dhoni) भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने भारताला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकवून दिल्या. त्याचसोबत इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. शुक्रवारी (15 डिसेंबर) माजी भारतीय कर्णधाराच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा सुनावली.
धोनीने माजी आयपीएल (IPS) अधिकारी संपत कुमार आणि एका वृत्तसंस्थेविरुद्ध आणि इतर काही जणांवर मानहानी केल्याप्रकरणी 100 कोटींचा खटला दाखल केला होता. माजी क्रिकेटपटूच्या म्हणण्याप्रमाणे वृत्तसंस्था आणि कुमार त्याच्याविषयी चुकीची माहिती आणि रिपोर्ट सादर करत आहेत. आयपीएल 2013 मध्ये समोर आलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणाशी हा सर्व प्रकार संबंधित असल्याचे समोर येत आहे. धोनीचे नाव जाणूनबुजून यामध्ये घेतल्यामुळे त्याने कुमार आणि वृत्तसंस्थेविरोधात हा खटला ठोकला होता.
न्यायमुर्ती एमएस सुंदर आणि जस्टिस सुंदर यांच्या खंडपिठाने शुक्रवारी कुमार यांच्यावर धोनीने केलेले आरोप योग्य असल्याचे स्पष्ट केले. याच कारणास्तव माजी आयपीएल अधिकाऱ्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. ही कोठडी 30 दिवसांनंतर आमलात आणता येईल. त्याआधी संपत कुमार या निर्णयाविरोधात अपील करता येऊ शकते. दरम्यान, कुमार यांनीच आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात सुरुवातीचा तपास केला होता. पण सट्टेबाजांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून मदत होत असल्याचे आरोप झाले. याच कारणास्तव पुढे त्यांना या प्रकरणात तपार करता आला नाही. (The IPS officer against whom Dhoni filed a defamation case has been sentenced to 15 days in police custody)
महत्वाच्या बातम्या-
‘तुझ्यामुळे मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली’, एबी डिव्हिलियर्सचं भारताच्या दिग्गज गोलंदाजाबाबत धक्कादायक विधान
शॉट असा मारा की, काहीही होवो, पण सिक्स गेला पाहिजे! रसेलने धडपडत मारलेला षटकार पाहिला का? Video Viral