पुणे : लॉयला चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी कल्याण प्रशाला संघाने तिनही वयोगटातील सामने जिंकून आपले वर्चस्व राखले. टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत ही स्पर्धा लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु आहे.
मुलांच्या १२ वर्षांखालील गटात पार्थ बधानीने नवव्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर कल्याणी प्रशाला संघाने इन्फंट जीझस प्रशाला संघाचा १-० असा पराभव केला. याच वयोगटातील अन्य एका सामन्यात विद्याभवन संघाने ह्यूम मॅकहेन्री प्रशालेवर ७-० असा एकतर्फी विजय मिळविला. विद्याभवनकडून जोनाथन मनोजने तीन आणि अर्णव भोसले, जोनाथन साळवे यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
कल्याणी प्रशाला संघाने १४ वर्षांखालील गटात इन्फंट जीझस प्रशाला संघाचा ३-१ असा पराभव केला. आरव नगरने चौथ्या मिनिटाला गोल केल्यावर देवांशन जोबनपुत्राने दोन गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. जीझस संघाकडून एकमात्र गोल रुद्र कदमने केला. कल्याणी संघाची विजयी मालिका १६ वर्षांखालील गटातही कायम राहिली. या गटातही त्यांनी जीझस प्रशाला संघाचाच ८-१ असा पराभव केला. अर्णव मेश्रामने चार, तर सोहम उत्तराने तीन आणि प्रणय चैननीने एक गोल केला.
निकाल –
१२ वर्षांखालील :
विद्या भवन प्रशाला : ७ (अर्णव भोसले ४, २६वे मिनिट, जोनाथन साळवे १६, ३३वे मिनिट, जोनाथन मनोज १८, २४, ३०वे मिनिट) वि.वि. ह्यूम मॅकहेन्री मेमोरियल स्कूल: ०
कल्याणी शाळा: १ (पार्थ बधानी ९वे मिनिट) वि.वि. इन्फंट जीझस हायस्कूल : ०
14 वर्षांखालील: विद्या भवन प्रशाला : ३ (मल्हार दरेकर ३३वे; वैभव मेलिन्केरी ३६वे; आयुष ठाकूर ४७वे मिनिट) वि.वि. ह्यूम मॅकहेन्री मेमोरियल स्कूल: ०
कल्याणी शाळा: ३ (आरव नगर ४थे; देवांश जोबनपुत्रा ४६, ४९वे मिनिट) वि. वि. इन्फंट जीझस हायस्कूल : १ (रुद्र कदम ३३वे मिनिट)
16 वर्षाखालील: कल्याणी शाळा: ८ (अर्णव मेश्राम २, ८, २५, ५६वे मिनिट; सोहम उत्तरा ४थे १३, ४८वे मिनिट, प्रणय चैनानी ३९वे मिनिट) वि.वि. इन्फंट जीझस हायस्कूल : १ (भूषण कुलकर्णी २०वे मिनिट).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला ‘या’ गोष्टी कराव्या लागणार! रोहित-विराटच्या विश्रांतीमुळे दिग्गज नाराज
जस्टिन लँगरच्या ‘भित्रा’ या वक्तव्याला पॅट कमिन्सचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया संघात…’