फ्रांसचे महान फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांनी बुधवारी (1 मार्च) अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. फॉन्टेन यांनी 1958 साली खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत एक विश्वविक्रम केला होता, जो आजही कायम आहे. त्यांनी या फुटबॉल विश्वचषकात एकूण 13 गोल केले होते. त्यानंतर आजपर्यंत एकही खेळाडू असा पाहायला मिळाली नाही, जो एका विश्वचषकात एवढे गोल करू शकला आहे.
जस्ट फॉन्टेन (Just Fontaine) यांचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम आजही कायम आहे. फॉन्टेन फ्रांसच्या रेम्स क्लब संघाकडूनही खेळले होते. मात्र, फुटबॉल कारकिर्दीत त्यांना फक्त एकच विश्वचषक खेळता आला. विश्वचषकाच्या इतिहासात त्यांनी सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तीन दिग्गज खेळाडूंना माग टाकले. पण या तीन खेळाडूंपैकी एकानेही एका विश्वचषकात अशी कामगिरी केली नव्हती. जागतिक फुटबॉलमध्ये सर्वकालीन सर्वोत्तम मानला जाणारा अर्जेंटिना संघाचा कर्णधार लियोनल मेसी याने कतर विश्वचषकात त्यांच्या 13 गोल्सची बरोबरी केली. पण मेसीने हे गोल करण्यासाठी पाच विश्वचषक खेळले.
पेलेकडून मिळालेला पराभव
1958चा विश्वचषक दिवंगत फुटबॉलपटू पेलेच्या कामगिरीसाठी ओळखला जाते. पेले यांनी उपांत्य सामन्यात फ्रांस संघाविरुद्ध 5-2 असा विजय मिळवला होता आणि वैयक्तिक गोल्सची हॅट्रिक देखील केली होती. पेले17 वर्षीय पेले यांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ब्राजीलने हा विश्वचषक जिंकला होता. पेले यांच्या चमकदार कामगिरीपुढे फॉन्टेन यांचे प्रदर्शन दाबले गेले, पण त्याचा विक्रम मात्र अबाधित राहिला.
Just Fontaine: A true footballing icon 🇫🇷
Celebrating the life of a legend and the owner of a record that may never be broken – 13 goals at a single #FIFAWorldCup.
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) March 1, 2023
फॉन्टेनने उपांत्या सामन्यात ब्राजीलकडून पराभव मिळाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात चार गोल दागले. वेस्ट जर्मनी संघाविरुद्धच्या या सामन्यात फ्रांसने 6-3 असा विजय मिळवला होता. फुटबॉल विश्वचषकाचा एकंदरीत इतिहास पाहिला तर फॉन्टेनपेक्षा जास्त गोल जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोस (16), ब्राजीलचा रोनाल्डो (15) आणि जर्मनीचा गेर्ड मुलर (14) यांनी केले आहेत. पण या तिघांनी एका विश्वचषकात हे गोल्स केले नाहीत. फॉन्टेनव्यतिरिक्त फक्त दोन असे फुटबॉलपटू आहेत, ज्यांनी एका विश्वचषक हंगामात दोन आकडी गोल्स दागले. पहिला म्हणजे गेर्ड मूलर आणि दुसरा हंगरीचा सेंडर कोसिस. मूलरने 1970 सालच्या विश्वचषकात 10 गोल्स केले होते, तर कोसिसने 1954 सालच्या विश्वचषका 11 गोल्स नावावर केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आला रे! आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सचे तुफान सज्ज, पूर्ण हंगाम खेळण्याचा दिला शब्द
“आयसीसी ट्रॉफी नसली तरी विराट महान कर्णधार”, दिग्गजाने दाखवली सत्य परिस्थिती