आगामी टी२० विश्वचषक २०२२ ला सुरुवात होण्यासाठी अवघे काही महिने बाकी आहेत. त्यामुळे टी२० विश्वचषकाबद्दलच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफ याने भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील मागील टी२० विश्वचषक सामन्याची आठवण काढत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताला पाकिस्तानच्या हातून १० विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या पराभवाबद्दल बोलताना राशिदने म्हटले आहे कीत या पराभवामुळे भारतीय संघाचे खूप नुकसान झाले होते. याच कारणामुळे भारतीय संघ सध्या त्या पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तो त्याच्या वैयक्तिक यूट्यूब चॅनलवर बोलत होता.
गतवर्षी युएईत झालेल्या टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघांचा आमना सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाने ऐतिहासिक कामगिरी करत भारताविरुद्ध विश्वचषकात सातत्याने पराभूत होण्याची नकोशी मालिका मोडली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १५१ धावाच करू शकला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानने सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांच्या खेळींच्या जोरावरच १७.५ षटकात हा सामना जिंकला होता. विश्वचषकात पाकिस्तानचा हा भारतावरील पहिलाच विजय होता.
मात्र या पराभवामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले होते. आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय संघाला आगामी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये मिळेल. तत्पूर्वी आशिया चषकातही हे दोन संघ भिडणार आहेत. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू राशिदच्या मते भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष सध्या आशिया चषकावरच असेल.
आपल्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल बोलताना राशिद म्हणाला की, “मला नाही वाटत की, सध्या भारतीय संघाच्या डोक्यात विश्वचषक असेल. ते सध्या प्रत्येक मालिकेत वेगळ्या योजनेसह खेळत आहेत. प्रत्येक मालिकेत संघ बदलत आहे. त्यांचे संपूर्ण लक्ष्य सध्या आशिया चषकावर असेल. पाकिस्तानविरुद्ध मिळालेल्या पराभवाने भारतीय संघाचे भरपूर नुकसान झाले होते. त्यामुळे ते त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्नशील असतील. तुम्ही किती सामने खेळलात, तरीही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे महत्त्व काही औरच असते.”
“माझ्या मते, भारतीय क्रिकेय बोर्ड आणि व्यवस्थापन पाकासित्नाविरुद्धच्या आशिया चषकातील सामन्याला खूप महत्त्व देईल. ते आशिया चषक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील. जर आशिया चषकात भारतीय संघातील सर्व प्रमुख खेळाडू उपलब्ध असतील, तर या संघाचा खेळ पाहण्यासारखा असेल,” असेही त्याने पुढे म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
संपुर्ण यादी: कॉमन वेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी पटकावलेल्या २० मेडल्सची यादी
आपण नुसतं पाहात बसायचं! ॲंडरसनने काढलेला ‘हा’ भन्नाट क्लीन बोल्ड बघाच
‘आशिया कप आणि टी२० विश्वचषकांत कोण असेल कर्णधार रोहितचा जोडीदार?’, माजी दिग्गजाने स्पष्टचं सांगितलं