पुणे। अटीतटीच्या लढतीत मेट्रोइट्स संघाने जनादेश संघाला पराभूत करताना विजय तर आझम स्पोर्ट्स अकादमीने एच पी रॉयल्स संघाला पराभवाचा धक्का देताना आझम महिला क्रिकेट टी-२० करंडक स्पर्धेत आपली विजयी आगेकूच कायम राखली.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या अत्यंत चूरशीच्या झालेल्या लढतीत मेट्रोइट्स संघाने जनादेश संघाला १ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना जनादेश संघाने १७.५ षटकांत ९ बाद १०८ धावा केल्या. भूमिका उंबरजेने २४(३ चौकार), श्री राठोडने २३(४ चौकार), तेजल हसबनीसने १४ (२ चौकार) धावांची खेळी केली. पूर्वा भईडकर व श्रेया परब यांनी प्रत्येकी ३ तर सोनाली शिंदेने १ गडी बाद केला.
उत्तरार्धात मेट्रोइट्स संघाने पूर्वा भईडकर व श्रेया परब यांच्या फलंदाजीच्या जोरावर १९.२ षटकांत ९ बाद १०९ धावा करत विजय साकारला. पूर्वा भईडकरने नाबाद २५ (३ चौकार) धावांची तर श्री राठोड हिने २३ (४ चौकार) खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संजुला नाईक १६ (३ चौकार) व इबतिस्म शेख १५ ( ३ चौकार) यांनी सुरेख साथ दिली. जनादेश संघाच्या भूमिका उंबरजे व आरती बेहनवाल यांनी प्रत्येकी ३ तर देविका वैद्य व तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मेट्रोइट्स संघाच्या पूर्वा भईडकरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या लढतीमध्ये आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने एच पी रॉयल्स संघाला ७ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १०८ धावा केल्या. यात सलामीवीर किरण नवगिरेने धडाकेबाज फलंदाजी करताना ५० चेंडूत ५ षटकार व ४ चौकार यांच्या मदतीने ६४ धावांची खेळी केली. संजीवनी पवारने १५ धावा करताना किरणला सुरेख साथ दिली. चार्मी गवईने २ तर, सायली लोणकर व गौतमी नाईक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
आझम संघाचे आव्हान एच पी रॉयल्स संघाला पेलावले नाही. एच पी संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १०१ धावाचं करता आल्या. एच पी संघाकडून सोनल पाटील २६ (२ चौकार), गौतमी नाईक १९( २ चौकार), मुक्ता मगरे १७ (३ चौकार), प्रज्ञा वीरकर १४, सायली लोणकर १०(२ चौकार), चार्मी गवई १० धावा करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. शरयू कुलकर्णीने ३, उत्कर्षा पवार व ऋषिता जंजाळ यांनी प्रत्येकी २ तर संजना शिंदेने १ गडी बाद केला. आझम संघाच्या किरण नवगिरेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
नॅशनल ड्यूटीमुळे शाकिब आयपीएल लिलावात राहिला अनसोल्ड? पत्नीने सांगितले खरे कारण
टेनिस क्रिकेटचा बादशाह खेळणार केकेआरसाठी; केवळ १० चेंडूत ठोकलेय अर्धशतक
रोहितने पाठराखण केल्यानंतर आता फलंदाजी प्रशिक्षकांनी विराट कोहलीच्या फॉर्म बद्दल केले मोठे वक्तव्य