भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघात सामील झाला आहे. रोहित ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर मागील १४ दिवस सिडनी येथे क्वारंटाईनमध्ये होता. त्यानंतर त्याचा बुधवारी(३० डिसेंबर) क्वारंटाईन कालावधी संपला. त्यामुळे आता तो ७ जानेवारीपासून सिडनीत सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
रोहित ऑस्ट्रेलियाला येण्यापूर्वी बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत(एनसीए) त्याच्या फिटनेसवर काम करत होता. त्याला २०२० च्या आयपीएल मोसमात खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० आणि वनडे मालिकेला मुकावे लागले.
पण आता भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाचे म्हणने आहे की कदाचित संघ व्यवस्थापन विचार करत असावा की रोहित त्याचे वजन कमी करुन त्याच्या फिटनेसच्या शिखरावर पोहचावा, ज्यामुळे त्याच्या खेळासाठी आणि भारतीय संघासाठीही ते फायदेशीर ठरेल.
ओझा म्हणाला, ‘एनसीएमध्ये असणाऱ्या तज्ञांची इच्छा होती की रोहितने तिथे थोडे त्याचे वजन कमी करावे आणि त्याच्या फिटनेसच्या शिखरावर पोहचावे. जेव्हा आपण खुप काळ खेळत नाही, तेव्हा दुखापत होण्याची शक्यता जास्त असते, जे आपण आयपीएलमध्ये पाहिले आहे. त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असावे की रोहित पूर्ण पणे फिट रहावा, ज्यामुळे त्याला दुखापत होण्याची भीती नसेल.’
तसेच ओझाने इंडिया टुडेशी बोलताना असेही सांगितले की एनसीएमध्ये रोहितचे वजन कमी करण्यावरही काम करण्यात आले. कारण लॉकडाऊनमुळे ६ महिन्यापेक्षाही जास्त वेळ क्रिकेट खेळता आले नव्हते, त्यामुळे तेव्हा त्याचे वजन थोडे वाढले होते. या ब्रेकमुळे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते.
त्याचबरोबर ओझाने असेही म्हटले की आला क्वारंटाईनमुळे १४ दिवस आपल्या खोलीतच रहावे लागल्याने त्याने पुन्हा सर्व सराव करण्याची गरज आहे. तसेच त्याला लवकरच परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू करतोय पुनरागमन
…म्हणून आयसीसीला मागावी लागली बेन स्टोक्सची माफी
साल २०२० मध्ये कसोटीत शतक करणारा ‘हा’ आहे एकमात्र भारतीय खेळाडू