गुजरात टायटन्स संघ येत्या सोमवारी सनराजर्स हैद्राबाद सोबत खेळल्या जाणाऱ्या मालिकेत नवीन जर्सीमध्ये दिसून येणार आहे. कर्णधार हा विरुद्ध न्यू जर्सी परिधान करेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंतची अभूतपूर्व कामगिरी करत आहे. गुजरात संघाने एकूण 12 सामने खेळले असून त्यातील 8 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
सध्या गुजरात टायटन्स 16 गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. आयपीएल 2023 (Indian Premier League 2023) च्या 57 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सकडून 27 धावांनी पराभव झाला. अशा परिस्थितीत गुजरातचा पुढचा सामना 15 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रंगणार आहे. या सामन्यात टायटन्स खास जर्सी (New Jersey against SRH IPL 2023) घालून मैदानात उतरणार आहे. टायटन्सने अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करून ही माहिती दिली. तर चला जाणून घेऊया गुजरातचा संघ आपल्या घरच्या मैदानावर वेगळी जर्सी घालून का दिसेल?
नवीन जर्सीचे कारण काय
खरं तर, या हंगामात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या टायटन्स संघाचा पुढील सामना 15 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) वि. खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान टायटन्स खास प्रकारची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. टायटन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. तर चला जाणून घेऊयात की, याच सामन्यासाठी गुजरात ही खास जर्सी का परिधान करेल. तर याचे कारण असे की, या नवीन जर्सीच्या माध्यमातून टायटन्स लोकांमध्ये कॅन्सरविरुद्ध जागरूकता पसरवणार आहे.
प्रचंड व्हायरल झाला व्हिडीओ
टायटन्सने अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही लॅव्हेंडर रंगासोबत युद्ध लढण्यासाठी तयार आहोत. सोमवारी या खास कारणासाठी आम्ही नवीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहोत. गुजरात टायटन्स तुमच्या आरोग्याची काळजी घेते आणि आम्ही लोकांना कॅन्सर विरुद्ध जागरूक करणार आहे.”
We are ready to don the lavender colours this Monday for a special cause 💜
Gujarat Titans cares about the health and wellness of one and all! Join us as we strive to raise awareness against cancer 🙌#GTvSRH | #AavaDe | #TATAIPL 2023 pic.twitter.com/0yBytStHjR
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 13, 2023
लोकांना जागरूकतेचा इशारा
यावेळी पुढे बोलताना गुजरात टायटन्सचे सीईओ म्हणाले की, “कर्करोगामुळे जगामध्ये दररोज लाखो लोकांचा मृत्यू होतो, त्यांच्या कुटुंबांवर विनाशकारी परिणाम होतो आहे. नवीन जर्सी परिधान करून आम्हाला आनंद होतो की, आम्ही आमच्या बाजूने एक छोटेसे पाऊल उचलत आहोत. ज्याद्वारे आम्ही लोकांना केवळ जागरूकच नाही तर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे शोधण्यासाठी देखील मदत करत आहे. कॅन्सरला (Canceer conscious) सुरुवातीपासूनच प्रतिबंध करण्यासाठी लोकांनी जागरूक होण अत्यंत गरजेचे आहे. (The new look of Gujarat Titans will be seen in the next match! This is the new jersey of Hardik’s team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात ‘झिरो’ ढरलेले पाच भारतीय दिग्गज, पण आता मैदानात ठरत आहेत ‘हिरो’
मुंबईचे पाऊल पडते पुढे! चालून आलीये टॉप 2 ची संधी, वाचा सारी समीकरणे