इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सहभागाला त्याच्या क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (१० ऑगस्ट) मान्यता दिली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या कालावधीतील सामन्यांचा खेळाडूंवरील ताण पाहता बांगलादेश आणि पाकिस्तान दौऱ्यासाठी त्याचबरोबर टी २० विश्वचषकासाठी वेगवेगळे संघ निवडले आहेत.
त्याचबरोबर न्यूझीलंडच्या एका संघाचे नेतृत्व केन विल्यमसन करणार आहे. जो टी २० विश्वचषकानंतर भारत दौरा करणार आहे. तर न्यूझीलंडचा दुसऱ्या संघाचे नेतृत्व टॉम लॅथम करणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहे. कारण आयपीएलचे उर्वरित सामने २० सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. टी २० विश्वचषकासाठी निवडलेले न्यूझीलंडचे काही खेळाडू त्या अगोदर आयपीएलमध्ये भाग घेणार आहेत. ही टी२० स्पर्धा यूएईमध्येच होणाऱ्या विश्वचषकासाठी चांगली तयारी सिद्ध होऊ शकते.
कोरोनाच्या महामारीमुळे आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने आणि विश्वचषक भारताऐवजी यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडे अजूनही टी२० विश्वचषकाचे यजमानपद असणार आहे. वरिष्ठ फलंदाज रॉस टेलरची पाकिस्तान संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली होती. पण नंतर भारताच्या कसोटी दौऱ्याच्या दृष्टीने तो न्यूझीलंड मध्येच तयारी करतील यावर सहमती झाली आहे. न्यूझीलंड संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने एका निवेदनात म्हटले आहे की, “न्यूझीलंड संघ २३ ऑगस्ट रोजी बांगलादेशला रवाना होणार आहे. तसेच या सामन्यांनंतर भारत दौऱ्यावर कसोटीत खेळणारे खेळाडू पुन्हा न्यूजीलंडला तयारीसाठी परततील.”
न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट हे खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्याविषयी म्हणाले की, “हा एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे. आम्ही नेहमीच आयपीएलबद्दल वास्तववादी राहण्याचा प्रयत्न केला आहे.”
न्यूझीलंडचे संघ खालीलप्रमाणे आहेत.
आयसीसी टी२० विश्वचषक आणि भारताविरुद्ध टी२० साठी न्यूझीलंड संघ
केन विलियम्सन (कर्णधार), टॉड एस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट (यष्टिरक्षक) ईश सोधी, टीम साउथी, ऍडम मिल्ले (खेळाडू जखमी झाल्यास)
बांगलादेश विरुद्ध टी २० आणि पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय संघ
टॉम लॅथम (कर्णधार, यष्टिरक्षक), फिन एलन, हमीश बेनेट, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), डग ब्रेसवेल, कॉलिन डी ग्रँडहोम, जेकब डफी, मॅट हेन्री (केवळ एकदिवसीय), स्कॉट कुगेलेजन, कोल मॅकॉन्ची, हेन्री निकोल्स, अयाज पटेल, रचिन रवींद्र, बेन सीअर्स (फक्त टी २० साठी), ब्लेअर टिकनर, विल यंग.
पाकिस्तान टी २० साठी संघ
टॉम लॅथम (कर्णधार, यष्टिरक्षक), फिन एलन, टॉड ऍस्टल, हमीश बेनेट, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), मार्क चॅपमन, कॉलिन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, डेरिल मिशेल, अयाज पटेल, ईश सोधी, बेन सीअर्स, ब्लेअर टिकनर, विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल द्रविडकडून जाणार एनसीए संचालकपद? बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय