आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. यावर्षी जगभरातील अनेक दिग्गज पुन्हा एकदा त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील, पण यामध्ये चाहत्यांची नजर विराट कोहली याच्यावर देखील असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट आता एका फलंदाजांच्या रुपात संघासोबत सहभागी होणार आहे आणि त्याच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार आहे. तसे पाहिले, तर एकट्या विराटचे प्रदर्शन आयपीएलच्या काही संघांपेक्षा सरस आहे.
विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलचा एक धमाकेदार फलंदाज आहे. आरसीबीसाठी त्याने आतापर्यंत ५ वेळा शतकी खेळी केली आहे. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ६२८३ धावा देखील आहेत. इतर कोणताच फलंदाज आयपीएमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करू शकलेला नाहीय. तसेच काही संघांनी एकूण केलेल्या शतकांपेक्षा विराटने एकट्याने केलेल्या शतकांची संख्या ही जास्त आहे. विराटपेक्षा कमी शतके करणाऱ्या संघांमध्ये ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ मुंबई इंडियन्सही सहभागी आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या एका शतकासह मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) संघाच्या खेळाडूंनी आयपीएमध्ये आतापर्यंत अवघी चार शतके केली आहेत. तसे २ वेळी विजेतेपद पटकावेलल्या कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) फक्त एक शतक झाले आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी ३ शतके केली आहेत. म्हणजेच या तीन संघांनी आतापर्यंत केलेल्या शतकांच्या तुलनेत विराट कोहलीचे एकट्याचे प्रदर्शन चांगले आहे.
आयपीएलच्या इतिसाहात सर्वाधिक शतके ठोकणारा संघ देखील विराटचा आरसीबी आहे. आरसीबीने आतापर्यंत १४ शतके केली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्ज आहे, ज्यांना आतापर्यंत १३ शतके केली आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे, ज्यांच्या खेळाडूंनी आतापर्यंत एकूण १० शतके केली आहेत. याव्यतिरिक्त कोणताही आयपीएल संघ नाहीय, ज्यांनी १० शतकांचा टप्पा ओलांडला असेल. एमएस धोनीचा सीसीएके आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येक ९-९ शतके केली आहेत.
आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जने प्रत्येकी १० शतकांचा टप्पा ओलांडला असला, तरी या तिन्ही संघांपैकी एकाही संघाला अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सव्यतिरिक्त सीएसके ४, तर केकेआरने २ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच राजस्थान रॉयल्स १ आणि सनरायझर्स हैदराबातने १ ट्रॉफी जिंकली आहे. सर्वाधिक शतके करणारे तिन्ही संघ आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेले नाहीत.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील रोमांच होणार कमी? सर्वात यशस्वी ५ गोलंदाजांपैकी हे ४ जणं स्पर्धेतून बाहेर






