क्रिकेट विश्वात एकापेक्षा एक जबरदस्त फलंदाज आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये, प्रत्येक रूपात म्हणजे कसोटी असो किंवा वनडे नाहीतर टी-२० असो यात अनेक महान फलंदाज होऊन गेले आहेत. या फलंदाजांनी अतिशय काळजीपूर्वक आणि समजुतीने खेळून ते मोठे फलंदाज बनले आहेत. परंतु या फलंदाजांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागची स्वतःची वेगळी शैली आहे. वीरेंद्र सेहवागची बाकीच्या फलंदाजांपेक्षा वेगळी शैली असून त्यानेही आपले नाव वेगळ्या पद्धतीने प्रस्थापित केले आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात स्फोटक आणि वादळी फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवागचा सर्वच स्वरूपात मोठा दर्जा आहे.
वीरेंद्र सेहवागने एका कॅलेंडर वर्षात चौकारांचा तिहेरी शतक झळकावले-
कसोटी क्रिकेटमध्ये वनडे शैलीप्रमाणे फलंदाजी करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्याने दोन तिहेरी शतकेही केली आहेत. या दोन तिहेरी शतकांशिवाय वीरेंद्र सेहवागने चौकारांचे आणखी एक तिहेरी शतक झळकावले.
भारताचा सर्वाधिक करमणूक करणारा फलंदाज वीरेंद्र सेहवागने एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकारांचा तिहेरी शतक झळकावले आहे. सन २००८ मध्ये त्याने हा पराक्रम केले.
त्यावेळी तो एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्याहून अधिक चौकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. आजपर्यंत त्याचा हा विक्रम एकाही भारतीय क्रिकेटपटूला करता आलेला नाही. त्यावेळी त्याने ३०२ षटकार मारले होते.
२००८ मध्ये सेहवागने मारले होते ३०२ चौकार –
२००८ मध्ये वीरेंद्र सेहवागने क्रिकेटच्या तीनही स्वरूपात मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०२ चौकार ठोकले. त्यावर्षी त्याने कसोटी क्रिकेटच्या २७ डावात १८१ चौकार, १८ वनडे सामन्यांमध्ये १२१ चौकार मारले. पण त्यावर्षी एक टी-२० सामना खेळला जेथे त्याला एकही चौकार ठोकता आला नाही.
जागतिक क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्याहून अधिक चौकार ठोकण्याचा विक्रम आत्तापर्यंत तिलत्करने दिल्शान, केन विलियम्सन, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांनाच करता आला आहे. एका वर्षात सर्वाधिक चौकार मारण्याचा विश्वविक्रम सध्या तिलत्करने दिल्शानच्या नावावर असून त्याने २००९ ला ३१८ चौकार मारले होते. तसेच संगकाराने असा पराक्रम २ वेळा केला आहे. त्याने २००६ आणि २०१४ या दोन वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा अधिक चौकार मारले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक चौकार मारणारे क्रिकेटपटू –
३१८ चौकार – तिलत्करने दिल्शान (२००९)
३०९ चौकार – केन विलियम्सन (२०१५)
३०७ चौकार – कुमार संगकारा (२००६)
३०२ चौकार – विरेंद्र सेहवाग (२००८)
३०१ चौकार – कुमार संगकारा (२०१४)
३०० चौकार – रिकी पाँटिंग (२००५)
महत्त्वाच्या बातम्या-
-जेव्हा क्रिकेटपटूंनी भरलेले जहाज भयानक तूफानामुळे बुडाले, झाला होता अनेक क्रिकेटर्सचा मृत्यू
-माजी गोलंदाज म्हणतोय, डीआरएस आधी असतं तर कधीच १० विकेट्स घेतल्या असत्या
-नताशाने मुलाला जन्म दिल्यानंतर एक्स बॉयफ्रेंडकडून मिळाली अशी प्रतिक्रिया…
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात हे ५ दिग्गज विदेशी खेळाडू दिसणार नाहीत, संघांचे टेन्शन वाढले
-हे ५ खेळाडू जिंकू शकतात आयपीएल २०२० ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ चा पुरस्कार
-४ असे वनडे सामने, जे टीम इंडियाने जिंकले केवळ १ धावेने