मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.
तो ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी पदार्पण करताना सलामीला फलंदाजी करणारा भारताचा केवळ दुसरा फलंदाज आहे. याआधी माजी क्रिकेटपटू अमिर इलाही यांनी 1947 मध्ये भारताकडून सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजी केली होती. विशेष म्हणजे ते या सामन्यात पहिल्या डावात 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते.
अमिर इलाही भारताकडून हा एकमेव कसोटी सामना खेळले आहेत. त्यानंतर ते पाकिस्तान संघाकडून 5 कसोटी सामने खेळले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 6 कसोटी सामने खेळले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध आजपासून सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मयंकने त्याला मिळालेल्या संधीचे सोने करताना पदार्पणाच्या पहिल्याच डावात अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने सुरुवातीला हनुमा विहारीबरोबर 40 धावांची सलामी भागीदारी केली होती. पण विहारी 8 धावांवर असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–८२ वर्षांनी टीम इंडियाला अनुभवयाला मिळाला हा सुवर्णक्षण
–२०१८मध्ये क्रिकेटमध्ये झाले हे मोठे ५ वाद
–हे ५ तरुण खेळाडू २०१९मध्ये होऊ शकतात टीम इंडियाचे शिलेदार