पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (6 जानेवारी) अनिर्णित राहिला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मजेशीर प्रसंग चाहत्यांना पाहायला मिळाला. आता या प्रसंगाची चर्चा सोशल मीडियावर देखील होऊ लागली आहे. पाकिस्तानच्या एका समालोचकाने न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू डॅनी मॉरिसन याचे नाव चुकवल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंड संघ फलंदाजी करत होता. न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यानच हा मजेशीर प्रसंग चाहत्यांना पाहायला मिळाला. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू डॅनी मॉरिसन (Dani Morrison) याचे नाव घेताना समालोचकाकडून मोठी चूक झाली. पाकिस्तानी समालोचकाने मॉरिसनऐवजी डॅनियल असा उल्लेख केल्यामुळे प्रेशकांसाठी हा मोठा गमतीचा प्रसंग ठरला. डॅनी डॅनियल (Dani Daniels) एक एडल्ट स्टार असल्यामुळे चाहत्यांवर पोट धरून हसण्याची वेळ आली आहे. ट्वीटरवर याविषयी चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
स्वतः डॅनी डॅनियल्सने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. डॅनीने एका चाहत्याचे ट्वीट रिट्वीट करत “मला कोचिंग स्टापमध्ये ठेवा,” म्हटले आहे. डॅनीची याविषयी प्रतिक्रिया पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. समालोचकांकडून ही चूक एजाज पटेल आणि मॅट हेनरी खेळपट्टीवर उपस्थित असताना झाली. पटेल आणि हेनरी यांनी संघासाठी 100 धावांची भागीदारी केली.
उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 449, तर दुसऱ्या डावात 5 बाद 277 धावा केल्या. दुसरीकडे पाकिस्तानचा पहिला डाव 408 धावांवर गुंडाळला गेला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला विजयासाठी 319 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण अटीतटीच्या या लढतीत पाकिस्तान संघ लक्ष्य गाठू शकला नाही. शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या 9 बाद 304 धावा होती. परिणामी सामना अनिर्णित राहिला. (The Pakistani commentator mistakenly named Danny Daniels instead of Danny Morrison)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दुखापतीनंतर लगेच इंटरनॅशनल क्रिकेट कशाला, आधी…’, नो- बॉलमुळे निशाण्यावर आलेल्या अर्शदीपवर भडकला गंभीर
AUSvSA: भारताचे टेंशन वाढले! सिडनी कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या खेळावर पावसाने फेरले पाणी