Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘दुखापतीनंतर लगेच इंटरनॅशनल क्रिकेट कशाला, आधी…’, नो- बॉलमुळे निशाण्यावर आलेल्या अर्शदीपवर भडकला गंभीर

'दुखापतीनंतर लगेच इंटरनॅशनल क्रिकेट कशाला, आधी...', नो- बॉलमुळे निशाण्यावर आलेल्या अर्शदीपवर भडकला गंभीर

January 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Arshdeep-Singh-And-Gautam-Gambhir

Photo Courtesy: Twitter/ICC


गुरुवारी (दि. 05 जानेवारी) भारतीय संघाला पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर श्रीलंका संघाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका संघाने भारताला 16 धावांनी पराभूत करत मालिकेत पुनरागमन केले. आता या मालिकेतील दोन्ही संघ प्रत्येकी 1 सामना जिंकत 1-1 अशा बरोबरीवर आहेत. भारतीय संघाकडून या सामन्यात खराब गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने 2 षटकात 37 धावा खर्च केल्या. त्यात 5 नो- बॉलचा समावेश होता. या खराब कामगिरीनंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर अर्शदीप सिंगवर भडकला आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील दुसऱ्या टी20 सामन्यानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने स्टार स्पोर्ट्सवर भाष्य केले. यावेळी तो म्हणाला की, “जर तुम्ही दुखापतीतून पुनरागमन करता, तेव्हा आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळले नाही पाहिजे. तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला पाहिजेत. तसेच, फॉर्मात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले पाहिजे. कारण, नो- बॉल कोणत्याच प्रकारे स्वीकारला जाणार नाही. जो कोणी दुखापतग्रस्त आहे, त्याने घरगुती क्रिकेटमध्ये खेळले पाहिजे.”

पुढे बोलताना गंभीर म्हणाला की, “क्षेत्ररक्षक चूक करू शकतो, कोणताही फलंदाज खराब शॉट खेळू शकतो. कोणताही गोलंदाज खराब चेंडू फेकू शकतो, पण नो- बॉल गरजेचा नाहीये. तुम्ही नक्कीच नेट्समध्ये सराव करताना असे करत असाल. त्यामुळे तुम्ही सामन्यातही असे करत आहात. हे गोलंदाजी प्रशिक्षकावर अवलंबून आहे की, त्यांनी या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे. त्यांनी सराव सत्रातही कठोर असावे लागते.”

नो- बॉलमुळे गमावला सामना
नो- बॉलमुळे भारतीय संघाला मोठे नुकसान झाले. भारतीय संघाकडून एकूण 7 नो- बॉल टाकण्यात आले. याचा फायदा श्रीलंकेच्या फलंदाजांनी घेतला. दसून शनाका याने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. त्यात नो- बॉलने महत्त्वाची भूमिका बजावली. इतकेच नाही, तर श्रीलंका संघाला नो- बॉलमध्ये एकूण 20 धावा अधिकच्या गेल्या. याचाच फटका भारतीय संघाला बसला.

सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर श्रीलंका संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 206 धावा चोपल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव गडगडला. त्यांना निर्धारित 20 षटकात 190 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना श्रीलंका संघाने 16 धावांनी खिशात घातला. (gautam gambhir advice for pacer arshdeep singh should be going to domestic cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेहनत फळाला आली! सरफराजने तब्बल 9 वर्षांनंतर झळकावले कसोटी शतक
पुण्यात दुसऱ्यांदा चमकला शनाका, आधी धोनी आणि आता कर्णधार हार्दिकला दिला धक्का


Next Post
Virat-Kohli-And-Anushka-Sharma

Video: अनुष्काने हात जोडताच पलटून एकटक पाहत राहिली लेक; वडील विराटसोबत वृंदावनमध्ये पोहोचली वामिका

Dani Daniels Babar Azam

डॅनी डॅनियल्सनेही घेतली पाकिस्तान संघाची फिरकी, समालोचकांकडून झाली मोठी चूक

Breaking

ब्रेकिंग! विश्वचषकात खेळलेल्या दिग्गज खेळाडूचे निधन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143