Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video: अनुष्काने हात जोडताच पलटून एकटक पाहत राहिली लेक; वडील विराटसोबत वृंदावनमध्ये पोहोचली वामिका

Video: अनुष्काने हात जोडताच पलटून एकटक पाहत राहिली लेक; वडील विराटसोबत वृंदावनमध्ये पोहोचली वामिका

January 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli-And-Anushka-Sharma

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. तो शेवटचा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसला होता. त्यानंतर त्याने क्रिकेटपासून थोडी विश्रांती घेतली आहे. त्याने त्याच्या कुटुंबासोबत दुबईत नवीन वर्षाचे स्वागत केले होते. आता तो पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका यांच्यासोबत वृंदावनमध्ये फिरत आहे. यादरम्यान विराट आणि अनुष्काने बाबा नीम करोली आश्रमाचाही दौरा केला. यावेळी त्यांची मुलगी वामिकाही होती. अशात सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ‘विरुष्का’सह त्यांची लेक वामिकाही मजा-मस्ती करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये दिसते की, वामिका (Vamika) हिचा चेहरा झाकलेला आहे. मात्र, तिचा मस्ती करतानाचा अंदाज या व्हिडिओत दिसत आहे. आशीर्वाद घेत असताना अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने वामिकाला तिच्या कुशीत बसवले आहे. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) हादेखील तिच्यासोबत बसला आहे. यावेळी जोडपे हात जोडत आशीर्वाद घेताना दिसले.

View this post on Instagram

A post shared by pranjal viratian❤️ (@pranjal_viratian)

आशीर्वाद घेण्याच्या दरम्यान वामिका विराटकडे जाते. वामिका ही यादरम्यान पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अनुष्का काळ्या रंगाच्या जॅकेट आणि पांढऱ्या रंगाच्या टोपीमध्ये दिसतेय, तर विराटने हिरव्या रंगाचा जॅकेट आणि काळ्या रंगाची टोपी परिधान केली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, बुधवारी (दि. 04 जानेवारी) सकाळी विराट आणि अनुष्का वृंदावन येथे पोहोचले होते. त्यांनी इथे आल्यानंतर गरजूंना चादर वाटली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि वामिका यांनी उत्तराखंडच्या आश्रमाचा दौरा केला होता. त्यावेळीही त्यांनी चादर वाटली होती.

सोशल मीडियावर विराट आणि अनुष्का तसेच वामिका यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, सर्व फोटोंमध्ये वामिकाचा चेहरा लपवला आहे. खरं तर, मुलीच्या जन्मानंतर विराटने त्यांच्या मुलीचा फोटो घेऊ नका असे पॅपराजींना आवाहन केले होते. त्यानंतर चाहते आणि पॅपराजीदेखील विराट आणि अनुष्काच्या या गोष्टीचा मान ठेवताना दिसत आहेत. ते कधीही वामिकाचा चेहरा दाखवत नाहीत. फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना नेहमी वामिकाचा चेहरा इमोजी किंवा इतर गोष्टीने लपवतात.

View this post on Instagram

A post shared by @virushka_always1801

विराटबद्दल बोलायचं झालं, तर तो श्रीलंकेविरुद्धच्या टी20 संघातून बाहेर आहे. वृत्तांनुसार, विराट आणि रोहित शर्मा यांना टी20 संघात सामील केले जात नाहीये. विराट 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करणार आहे. (virat kohli anushka sharma took blessings in the ashram of vrindavan see daughter vamika video here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दुखापतीनंतर लगेच इंटरनॅशनल क्रिकेट कशाला, आधी…’, नो- बॉलमुळे निशाण्यावर आलेल्या अर्शदीपवर भडकला गंभीर
मेहनत फळाला आली! सरफराजने तब्बल 9 वर्षांनंतर झळकावले कसोटी शतक


Next Post
Dani Daniels Babar Azam

डॅनी डॅनियल्सनेही घेतली पाकिस्तान संघाची फिरकी, समालोचकांकडून झाली मोठी चूक

Breaking

ब्रेकिंग! विश्वचषकात खेळलेल्या दिग्गज खेळाडूचे निधन

Virat-Kohli

'मी भविष्यवाणी करतोय विश्वचषकात विराट गंभीरसारखाच...', भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे भाष्य

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143