---Advertisement---

ब्रदरली चॅलेंज! जेव्हा पंड्या बंधू जीममध्ये देतात एकमेकांना आव्हान, पाहा काय लागला निकाल

On: रविवार, जुलै 11, 2021 4:53 PM
---Advertisement---

भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना दुसरीकडे भारताचा मर्यादित षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. यात हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंचाही समावेश आहे. नुकाताच त्यांचा या दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे, ज्यात या दोन भावांनी एकमेकांना जीममध्ये आव्हान दिल्याचे दिसत आहे.

पंड्या बंधूंनी दिलं एकमेकांना आव्हान
या दौऱ्याचे वेळापत्रक काहीदिवसांपूर्वीच बदलण्यात आले आहे. बदललेल्या वेळापत्रकानुसार आता या दौऱ्यातील सामन्यांना १३ जुलैऐवजी १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या श्रीलंकेत असलेले भारतीय खेळाडू सरावावर भर देत आहे. याचदरम्यान जीममध्ये हार्दिक आणि कृणाल यांच्यामध्ये जीम चॅलेंज ठेवण्यात आले होते.

त्यांच्या या चॅलेंजच्या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की ‘हे सोपं दिसतं, पण तितकं सोपं नाही. या चॅलेंजपैकी काहीही घरी करताना काळजी घ्या. पंड्या बंधूंना आनंद सुब्रमण्यम आणि अमेय टिळक यांच्याकडून जीम चॅलेंज देण्यात आले आहे.’

या व्हिडिओमध्ये दिसते की हार्दिक म्हणतो ‘मला वाटते की जीम चॅलेंज कृणालने जिंकावे, पण जेव्हा स्पर्धेची वेळ येते, तेव्हा मी जिंकण्यासाठी सर्वकाही पणाला लावेल.’ तसेच या व्हिडिओच्या शेवटी हार्दिक म्हणते की ‘हे चॅलेंज सोपे दिसत आहे, पण आहे कठीण.’

या चॅलेंजमध्ये पंड्या बंधूंना तीन व्यायामाचे प्रकार करायचे होते. पहिला प्रकार ‘वॉल स्कॉट होल्ड’ होता. ज्यात कृणालने बाजी मारली. त्यानंतर या दोघांनी ‘ग्लुट ब्रिज’ चॅलेंज केलं, ज्यात हार्दिक जिंकला. अखेरचे चॅलेंज होते ‘स्लिट स्कॉट होल्ड’, ज्यात या दोघांपैकी कोणीही हरले नाही. त्यामुळे अखेर हार्दिकने कृणाबरोबर हस्तांदोलन करत या संपूर्ण जीम चॅलेंजमध्ये बरोबरी झाल्याचे सांगितले.

दौऱ्यात हार्दिक गोलंदाजी करण्याची शक्यता
साल २०१९मध्ये हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून हार्दिक खूप कमी वेळा गोलंदाजी करताना दिसला. हार्दिकचे कसोटी संघातून बाहेर जाण्यामागे त्याची गोलंदाजी न करणे, ही गोष्ट देखील कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. पण श्रीलंका दौऱ्यातील सामने सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाने एकमेकांशी खेळलेल्या सराव सामन्यात (इंट्रा स्कॉड सामने) हार्दिक गोलंदाजी करताना दिसला होता. त्यामुळे हार्दिक या श्रीलंका दौऱ्यात गोलंदाजी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (The Pandya brothers face off in a quick gym challenge )

असा आहे श्रीलंका दौरा 
या श्रीलंका दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले जाणार आहे. या दौऱ्याला बदललेल्या वेळात्रकानुसार १८ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. १८ जुलैनंतर २० आणि २३ जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. टी२० मालिकेतील सामने अनुक्रमे २५, २७ आणि २९ जुलै रोजी खेळले जातील. वनडे आणि टी२० मालिकेतील सर्व सामने कोलंबो येथेच होणार आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकासाठी बड्या खेळाडूने निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, धवनला दाखवला बाहेरचा रस्ता

प्रेयसी अथियाच्या भावासोबत चिल करताना दिसला राहुल; नेटकरी म्हणे, ‘भावजी-मेहुणे एकत्र’

हेटमायरने दिग्गज ऑसी गोलंदाजाच्या चेंडूवर मारला स्कूप शॉट; चाहते म्हणाले, ‘हे राजामाणसांचे छंद’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---