दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन होऊ शकते. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याविषयी माहिती दिली. डू प्लेसिसच्या पुनरागमनासाठी दरवाजे नेहमी उघडे आहेत, अशी प्रतिक्रिया बोर्डाकडून दिली गेली आहे. डू प्लेसिस आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आफ्रिकी संघाचे प्रशिक्षक असणारे रॉब वाल्टर यांच्यात चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis ) याने 2021 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. टी-20 फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटीतून निवृत्ती घेत असल्याचे डू प्लेसिसने सांगितले. पण नंतर कालांतराने त्याला वनडे आणि टी-20 संघातील स्थानही गमवावे लागले. राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर डू प्लेसिस जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळत राहिला आणि त्या त्याठिकाणी स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. पण तरीदेखील राष्ट्रीय संघात त्याचे पुनरागमन होऊ शकले नाही. ,
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर यांनी डू प्लेलिसचे संघात पुनरागमन होणार असल्याची माहिती दिली. डारेक्टरांच्या हवाल्याने अशी माहिती दिली गेली आहे की, “आम्ही नेहमी आमच्या फ्रिलांस खेळाडूंसोबत चर्चा करण्यासाठी तयार असतो. प्रशिक्षक रॉब देखील खेळाडूंशी पुन्हा चर्चा करण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. खुपसारे खेळाडू असे आहेत जे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. तर काही खेळाडू असेही आहे जे एकतर व्हाईट बॉल क्रिकेट खेळता किंवा रेड बॉल क्रिकेट खेळतात. विश्वचषकापूर्वी निवड समिती आणि प्रशिक्षकांसोबत फाफ डू प्लेसिसच्या पुनरामनाविषयी चर्चा झाली होती. पण चर्चेनंतर काहीच निर्णय घेतला गेला नाही. क्रिकेट बोर्डाच्या रूपात आपल्याला या मुद्यावर मार्ग कसा निघेल, हे पाहावे लागेल.”
दरम्यान, डू प्लेसिसने त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यानंतर टी-20 फॉरमॅटमध्ये 90 इंनिंग्ज खेळल्या. यात 33.91च्या सरासरीने डू प्लेसिसच्या बॅटमधून 2747 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने पीएसएल, सीपीएल, बीपीएल, बीबीएल आणि यावर्षी सुरू झालेल्या एसए20 लीगमध्ये भाग घेतला. यादरमन्यात त्याच्या बॅटमधून चार शतक देखील आले. एसए20लीगमध्ये डू प्लेसिसने 369 धावा केल्या.
(The South Africa Cricket Board is all set to rejoin Faf du Plessis)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत