श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत श्रीलंकेने वर्चस्व गाजवले. श्रीलंकेने दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरीचे प्रदर्शन दाखवत 2-0 ने मालिका खिशात घातली. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात 63, तर दुसऱ्या सामन्यात 154 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तत्पूर्वी श्रीलंकेच्या या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (ICC World Test Championship Points Table) काय बदल झाले आहेत? या बातमीद्वारे जाणून घेऊया.
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचा श्रीलंकेच्या संघाला चांगलाच फायदा झाला आहे. 9 सामन्यात 5 विजय आणि 4 पराभवांसह श्रीलंका 55.56 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका संघाने काही आगामी सामने जिंकले, तर तो ऑस्ट्रेलियाला मागे टाकून दुसरे स्थान पटकावून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनल सामन्यासाठीही दावेदार ठरू शकतो.
भारतीय संघ अजूनही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत शीर्ष स्थानी कायम आहे. या डब्ल्यूटीसीच्या चक्रात भारताने 10 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 7 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे, 2 सामन्यात पराभव झाला आहे. भारताचा एक सामना अनिर्णित राहिला. भारताचे गुणतालिकेत 71.67 टक्के गुण आहेत. भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 62.50 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेनंतर इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने डब्ल्यूटीसीच्या चक्रात 16 सामने खेळले आहेत. 42.18 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेश संघ 39.29 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत दौऱ्यापूर्वी श्रीलंकेनं धुतलं, कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा लाजिरवाणा पराभव
कानपूर कसोटीचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया, सामन्याची ड्रॉ च्या दिशेनं वाटचाल
केवळ धोनीच नाही, तर या दोन दिग्गजांनाही ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून रिटेन करता येईल; जाणून घ्या