---Advertisement---

आयपीएल फायनलमध्ये या ३ संघांनी पाहिले आहेत सर्वाधिक पराभव

On: मंगळवार, ऑगस्ट 25, 2020 8:28 AM
---Advertisement---

आयपीएल २०२० कधी होईल याबद्दल सध्यातरी काहीही सांगता येणार नाही. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.

आयपीएलचे आजपर्यंत १२ हंगाम झाले असून यात अनेक संघांनी अनेक विक्रम केले. परंतु चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स संघांची मक्तेदारी कायमच या स्पर्धेत दिसली.

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स चार वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात आमने सामने आले आहेत. यामध्ये मुंबईने ३ वेळा तर चेन्नईने १ वेळा बाजी मारली आहे.

मुंबईने आजपर्यंत ४ वेळा तर चेन्नईने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवली आहेत.

तसेच आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम सामना गाठणाऱ्या संघांमध्येही चेन्नई आणि मुंबई अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर आहेत.

चेन्नई सुपक किंग्जने ८ वेळा, मुंबई इंडियन्सने ५ वेळा तर राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघाने ३ वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

राॅयल चॅलेंजर बेंगलोरने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३ पैकी ३ सामन्यात पराभव पाहिले आहेत तर चेन्नईन ८ अंतिम सामन्यात ५ पराभव पाहिले आहेत.

कोलकता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांनी आत्तापर्यंत 2 वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. विशेष म्हणजे कोलकताने खेळलेल्या दोन्ही अंतिम सामन्यात विजयही मिळवला आहे. तर हैद्राबादला एक विजय आणि एक पराभव स्विकारावा लागला आहे.

तसेच रायझिंग पुणे सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबने प्रत्येकी 1 वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे.

आत्तापर्यंत या संघांमध्ये झाला आहे आयपीएलचा अंतिम सामना – 

2008 – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (विजेता – राजस्थान रॉयल्स)

2009 – डेक्कन चार्जर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (विजेता – डेक्कन चार्जर्स)

2010 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (विजेता – चेन्नई सुपर किंग्स)

2011 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (विजेता – चेन्नई सुपर किंग्स)

2012 – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (विजेता – कोलकता नाईट रायडर्स)

2013 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (विजेता – मुंबई इंडियन्स)

2014 – कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (विजेता – कोलकता नाईट रायडर्स)

2015 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (विजेता – मुंबई इंडियन्स)

2016 – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (विजेता – सनरायझर्स हैद्राबाद)

2017 – रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (विजेता – मुंबई इंडियन्स)

2018 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (विजेता – चेन्नई सुपर किंग्स)

2019 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (विजेता – मुंबई इंडियन्स)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment