Mumbai, March 27, 2023: भारतातील अल्टीमेट टेबल टेनिस (UTT) स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या स्पेर्धेचे आयोजन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. १३ जुलै २०२३ पासून अल्टीमेट टेबल टेनिसच्या स्पेर्धेला सुरुवात होणार असून ३० जुलै रोजी अंतिम सामना होणार आहे.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशन (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने सर्वात प्रथम २०१७ रोजी नीरज बजाज आणि विता दानी यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. यानंतर टेबल टेनिस विश्वात ही स्पर्धा गेम चेंजर म्हणून ओळखली गेली. भारतात जागतिक दर्जाचे टेबल टेनिसपटू आणण्याबरोबरच अल्टीमेट टेबल टेनिसच्या स्पेर्धेत साथियान ज्ञानसेकरन, मानव ठक्कर, सुतीर्थ मुखर्जी आणि मनिका बत्रा यांसारख्या स्टार भारतीय खेळाडूंचा दर्जेदार खेळ अनुभवायला मिळाला, ज्यांनी सुरुवातीच्या हंगामात आपल्या अप्रतिम कामगिरीने देशाचे लक्ष वेधून घेतले.
“अल्टीमेट टेबल टेनिस (UTT) स्पर्धा आयोजित करण्यामागे आमचे मुख्य उद्दिष्ट भारतात या खेळाला लोकप्रिय करणे हे होते. मात्र ही स्पर्धा काही कारणास्तव २०१९ सालानंतर होऊ शकली नाही. परंतु आता या स्पर्धेचा थरार पुन्हा रंगणार आहे. भारतातील टेबल टेनिस एका जागतिक स्थरावर नेण्यासाठी आम्ही तयार आहोत”, असं सह-प्रवर्तक निरज बजाज यांनी सांगितले.
२०१९ साली अल्टीमेट टेबल टेनिसच्या स्पर्धेचे दिल्लीत अयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय टेबल टेनिसचे दिग्गज शरथ कमलच्या नेतृत्वाखाली चेन्नई लायन्सने साथियानच्या दबंग दिल्लीचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. २०१८ रोजी मनिका बत्रा आणि साथियान यांच्या नेतृत्वाखालील दबंग दिल्ली टीटीसीने, तर २०१७ रोजी फाल्कन्स टीटीसीने या स्पर्धेत बाजी मारली होती.
“कोरोनामुळे अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेला ब्रेक लागला होता. मात्र आता आम्हाला या स्पर्धेच्या पुनरागमनाची घोषणा करताना मला खूप आनंद होतोय. भारतात या स्पर्धेला आणखी लोकप्रिय करण्याचा आमचा प्रयत्न राहील. भारतीय टेबल टेनिस फेडरेशनसोबत हातमिळवणी करून आम्ही देशातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देत राहू. तसेच आम्हाला पाठिंबा दिल्याबाबद्दल मी फेडरेशनचे देखील आभार मानते”, असं अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेचे चेअरपर्सन विता दानी म्हणाल्या.
यू-मूम्बा टेबल टेनिस, पुणेरी पलटण टेबल टेनिस, गोवा चॅलेंजर्स टेबल टेनिस, दबंग दिल्ली टेबल टेनिस आणि आरपीएसजी Mavericks कोलकाता या टीम सालाबादप्रमाणे यंदाही कायम राहणार आहेत. २०२३ च्या स्पर्धेत बंगळुरू स्मॅशर्स टेबल टेनिस या नवीन टीमही सामील होणार आहे. या टीमचे मालक पुनित बालन यांच्या मालकीचे आहे, जे पुनित बालन ग्रुपचे प्रमुख आहेत. अल्टिमेट खो-खो, टेनिस प्रीमियर लीग आणि प्रीमियर हँडबॉल लीगमधील फ्रँचायझीमध्ये ते गुंतवणूकदार आहेत.
“टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाला भारतातील खेळाच्या वाढीसाठी कटिबद्ध असलेल्या लीगला पाठिंबा देण्यास आणि प्रोत्साहित करण्यात आनंद आहे.अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेने देशात जागतिक दर्जाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि जगातील सर्वोत्कृष्ट कलागुणांना आकर्षित करण्यासाठी भारताला जगाच्या नकाशावर आणण्यास मदत केली आहे. आगामी हंगामात यूटीटीला यश मिळावे अशी आमची इच्छा आहे”, असं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाला अध्यक्षा मेघना अहलावत आणि महासचिव कमलेश मेहता यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
(The thrill of the ‘Ultimate Table Tennis’ tournament will be played again; The matches will be held at the Balewadi Complex in Pune from 13th July)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ठरलं! यावर्षी आयपीएलमध्ये चार संघांना मिळणार नवीन कर्णधार, रोहित दिसणार जुन्याच भूमिकेत
बीसीसीआयच्या नव्या वार्षिक करारात कोणाचे प्रमोशन तर कोणाचे डीमोशन, दिग्गज तर बाहेरच