जगभरात आपले पाय पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही ठप्प अर्थात बंद पडले आहे. याचा क्रीडाक्षेत्रावरही अधिक परिणाम झालेला आहे. या व्हायरसमुळे अनेक क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आलेल्या आहेत.
अशा परिस्थितीत क्रिकेटपटूंबद्दल सांगायचं झालं तर अनेक स्टार क्रिकेटपटू आपापल्या घरात वेळ घालवत आहेत. आता जे खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर स्टार क्रिकेटपटूंसारखे राहत होते, त्याच खेळाडूंना आता आपल्या घरात कपडे धुवावे लागतात. इतकेच नव्हे तर टॉयलेटही साफ करावे लागत आहे.
प्रत्येक क्रिकेटपटू आपापल्या घरात बसले असून ते आपल्या चाहत्यांसाठी नवे-नवे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे, भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा (Shikhar Dhawan) एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
धवनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “एका आठवड्यानंतर घरात बसल्यावर जीवन असे असते. वास्तविकता कठीण आहे.”
https://twitter.com/SDhawan25/status/1242435125423616000
मंगळवारी (२४ मार्च) धवनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो कपडे धुताना (Wash Clothes) दिसत आहे. तर त्याची पत्नी आयशा (Ayesha) मेकअप करत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका व्हिडिओच्या दुसऱ्या बाजूला धवन टॉयलेट साफ (Toilet Cleaning) करतानाही दिसत आहे आणि त्याची पत्नी त्याला ऑर्डर देत आहे.
यापूर्वीही धवनने कोरोना व्हायरसशी (Corona Virus) निगडीत एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो गाणे गात होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२००७ विश्वचषकाचा हिरो थेट रस्त्यावर उतरुन लोकांना करतोय मदत
-सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच
-टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी