आजपर्यंत आपण क्रिकेट जगतात अनेक प्रकारचे खेळाडू पाहिले असतील, जे वयाने लहान किंवा मोठे, वजनाने जास्त किंवा छोट्या चनीचे असे असतील. आता आपण क्रिकेट जगतातील ५ असे क्रिकेटपटू पाहणार आहोत ज्यांची उंची संपूर्ण जगात सर्वात जास्त आहे.
५. ख्रिस ट्रेमलेट-
ख्रिस ट्रिमलेट (Chris Tremlett) हा इंग्लंड (England) संघाचा माजी वेगवान गोलंदाज ज्याची उंची ६ फूट ७ इंच आहे. त्यांच्या उंचीमुळे त्याला अनेक वेळा दुखापतींना सामोरे जावे लागले होते. दुखापतींमुळेच त्याची कारकीर्द खूप लवकर संपुष्टात आली.
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण २८ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने केवळ ६० विकेट्स घेतल्या आहेत.
४. पीटर जॉर्ज-
पीटर जॉर्ज (Peter George) ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी वेगवान गोलंदाज आहे. त्याची उंची ६ फूट ८ इंच आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. तो सामना त्याने २०१०मध्ये भारताविरुद्ध खेळला होता.
या कसोटी सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २१४ धावांवर बाद केले होते. त्याने आपल्या कारकीर्दीत केवळ २ विकेट्स घेतल्या आहेत.
३. ब्रूस लेर्ड-
ब्रूस लेर्ड (Bruce Leird) हे ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाजी करत होते. त्यांची उंची ६ फूट ८ इंच आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून २१ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ४ च्या इकॉनॉमीने केवळ १२ विकेट्स घेतल्या आहेत.
आपल्या क्रिकेट कारकीर्दीत नंतर त्यांनी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. ते २००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.
२. जोएल गार्नर-
जोएल गार्नर (Joel Garner) हे वेस्ट इंडीज (West Indies) संघाचे माजी वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना घातक गोलंदाजीसाठी ओळखले जात होते. त्यांची उंची ६ फूट ९ इंच आहे. फलंदाजीस अनुकूल अशा खेळपट्टीवरही जोएल वेगवान गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरले. शॉर्ट चेंडूसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर त्यांनी उसळी गोलंदाजी करून फलंदाजांना त्रास दिला.
त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ५८ कसोटी आणि ९८ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटीत २५९ आणि वनडेत १४६ विकेट्स घेतल्या आहेत.
१. मोहम्मद इरफान-
सध्या जगातील सर्वात उंच क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद इरफान (Mohammad Irfan) अव्वल स्थानी आहे. त्याची उंची ७ फूट १ इंच इतकी आहे.
त्याने वयाच्या २१ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यापूर्वी तो प्लॅस्टिक पाईप तयार करण्याच्या कारखान्यात काम करत होता. त्यामुळे इरफानची प्रतिभा ओळखण्यासाठी प्रशिक्षकांना बर्यापैकी वेळ लागला.
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ४ कसोटी सामने, ६० वनडे सामने आणि २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. कसोटीत १०, वनडेत ८३ आणि टी२०त १६ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कॅप्टन कूल धोनीच्या चेन्नईला सतत त्रास देणारे हे ३ खेळाडू
-अशा क्रिकेट टीम ज्यांच्या नावात येतात प्राण्यांची विचित्र नाव
-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही धावला कोरोना बाधितांच्या मदतीसाठी